Sandeshkhali: संदेशखलीमध्ये जाणाऱ्या फॅक्ट फाइंडिंग टीमच्या सदस्यांना अटक | पुढारी

Sandeshkhali: संदेशखलीमध्ये जाणाऱ्या फॅक्ट फाइंडिंग टीमच्या सदस्यांना अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : संदेशखलीतील पीडितांना भेटण्यासाठी फॅक्ट फाइंडिंग टीम बंगालच्या दौऱ्यावर गेली होती. मात्र, संदेशखलीमध्ये पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना रोखले. याच्या निषेधार्थ फॅक्ट फाइंडिंग टीमने त्याठिकाणी धरणे धरून बसली होती. या गोंधळानंतर पोलिसांनी टीममधील सर्व सदस्यांना अटक केली. Sandeshkhali

 फॅक्ट फाइंडिंग टीमचे सदस्य चारू वली खन्ना यांनी सांगितले की, आम्ही संदेशखली येथे जात होतो, मात्र आम्हाला रोखण्यात आले. पोलिसांनी जाणूनबुजून आम्हाला अडवले असून त्रास दिला जात आहे. पोलीस आम्हाला पीडितांना भेटू देत नाहीत. ‘आम्हाला का ताब्यात घेतले आहे, याचे उत्तर पोलिसांनी द्यावे? पोलिसांनी आम्हाला रोखण्याचे कोणतेही कारण नाही, त्यांना तसे करण्यास सांगितले जात आहे. Sandeshkhali

टीमचे सदस्य ओपी व्यास म्हणाले की, ‘आम्ही येथे शांततेने बसलो आहोत आणि पोलिसांच्या कारवाईचा निषेध करत आहोत. कारण आम्हाला बेकायदेशीरपणे थांबवण्यात आले आहे. हे आमच्या हक्कांच्या विरोधात आहे. याबाबत आम्ही मुख्यमंत्री, राज्यपाल, केंद्रीय गृहमंत्री आणि पंतप्रधानांकडे तक्रार करणार आहोत. रामनवमीच्या वेळीही आम्हाला अशाच प्रकारे थांबवण्यात आले. कारण ते काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत होते. सरकारला कोणते चित्र दाखवायचे आहे ते समजत नाही. राज्यातील घटनात्मक संरचना नष्ट केली जात आहे. दुर्दैवाने पोलिसही बेकायदेशीर आदेशांचे पालन करून कायदा हातात घेत आहेत.

हेही वाचा 

Back to top button