मीच कंपनीचा सीईओ, बाकी सर्व अफवा : Byju Raveendran यांचे कर्मचार्‍यांना पत्र | पुढारी

मीच कंपनीचा सीईओ, बाकी सर्व अफवा : Byju Raveendran यांचे कर्मचार्‍यांना पत्र

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मी आजही कंपनीचा सीईओ आहे. व्‍यवस्‍थापनात कोणताही बदल झालेला नाही. मला पदावरुन हटवले, ही अफवा आहे, असे  एज्युकेशन टेक्नॉलॉजी कंपनी ‘बायजू’चे संस्थापक बायजू रवींद्रन यांनी कर्मचार्‍यांना लिहिलेल्‍या पत्रात स्‍पष्‍ट केले आहे. गैरव्यवस्थापन आणि अपयशचा ठपका ठेवत ‘बायजू’च्या ६० टक्‍के गुतवणूकदारांनी बायजू रवींद्रन यांना सीईओ पदावरुन हटवावे तसेच त्‍यांना कंपनीच्‍या मंडळातून काढून टाकावे, यासाठी मतदान केले होते. यानंतर रवींद्रन यांनी आपली भूमिका स्‍पष्‍ट केले आहे.
( I remain CEO : Byju Raveendran )

आपल्‍या पत्रात रवींद्रन यांनी म्‍हटले आहे की, शुक्रवार झालेल्‍या कंपनीच्‍या सर्वसाधारण सभेत (EGM) अनेक महत्त्वाच्या नियमांचे उल्लंघन झाले. या बैठकीत काही निर्णय हे नियमबाह्य होते. माझ्या कंपनीचा सीईओ म्हणून मी तुम्हाला हे पत्र लिहित आहे.  मीच कंपनीचा सीईओ राहणार आहे. व्यवस्थापनात कोणताही बदल होणार नाही आणि मंडळही तसेच राहील, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे. बाकी सर्व अफवा आहेत. गुंतवणूकदारांची बैठकीला योग्‍य संख्‍याबळ नव्‍हते. या बैठकीत किमान एका संस्थापक संचालकाची उपस्थिती आवश्यक होती, असेही त्‍यांनी पत्रात नमूद केले आहे. ( I remain CEO : Byju Raveendran )

कंपनीकडून FEMA कायद्याचे उल्लंघन : ईडीचा दावा

नुकतीच ईडीने बायजू रवींद्रन यांना बजावलेल्‍या नोटीसमध्‍ये म्‍हटले  हाेते की, ” बायजू कंपनीने भारताबाहेर महत्त्वपूर्ण परदेशी निधी पाठवला. परदेशात गुंतवणूक केली, जी FEMA, 1999 च्या तरतुदींचे कथित उल्लंघन करते आणि त्यामुळे भारत सरकारच्या महसुलाचे नुकसान झाले आहे”. (Byju’s News)

एप्रिल 2023 च्या छापेमारीनंतर ‘ईडी’ने एका निवेदनात म्हटले हाेते की, ‘बायजू’च्या फेमा शोधातून असे दिसून आले की, कंपनीला 2011 ते 2023 पर्यंत सुमारे 28,000 रुपये कोटी रुपयांची थेट विदेशी गुंतवणूक मिळाली. यामधून कंपनीने विविध देशांना 9,754 रुपये कोटी पाठवले आहेत. याच काळात त्यांनी थेट परकीय गुंतवणुकीच्या नावावर दावा केला होता. यानंतर  बायजू रवींद्रन यांच्याविरुद्ध लूकआऊट सर्कुलर बजावण्यास सांगण्यात आले होते.

हेही वाचा : 

 

Back to top button