पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात भीषण अपघात झाला. आज (दि.२४) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पटियाली-दरियावगंज रस्त्यावर भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली तलावात कोसळली. चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या भीषण अपघातात बहुसंख्य भाविकांचा मृत्यू झाला. या अपघातात आतापर्यंत ७ मुलांसह २४ जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटना झालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून महिला आणि मुलांसह ५२ लोक प्रवास करत होते. (UP Road Accident)
या दुर्घटनेतील मृतांमध्ये ८ महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. अनेक गंभीर जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डीएम, एसपी आणि इतर प्रशासकीय आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
मृतांमध्ये एकाच कुटुंबातील अनेकांचा समावेश आहे. या अपघातात आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी प्रशासनाने केली आहे. सीएमओ डॉ. राजीव अग्रवाल यांनी सांगितले की, पटियालीच्या सीएचसीमध्ये ७ मुले आणि ८ महिलांना मृत घोषित करण्यात आले आहे. यासोबतच आणखी ५ जणांना मृत घोषित करण्यात आले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. परिस्थिती अधिक गंभीर आहे.
हेही वाचा