

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईहून मॉरिशसला जाणाऱ्या 'एअर मॉरिशस'च्या विमानात शनिवारी (दि.२४) सकाळी मोठा बिघाड झाला. विमानातील एसी यंत्रणा पूर्णपणे निकामी झाली, त्यामुळे यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. मॉरिशसला जाणाऱ्या विमानातील प्रवाशी तब्बल पाच तास विमानातच अडकले. विमानात प्रवेश करताच एसीच्या समस्येमुळे यातून प्रवास करणाऱ्या अनेक लहान मुलांना आणि एका वयोवृद्ध व्यक्तीला श्वसनाचा त्रास झाला. मात्र, असे असतानाही त्यांना विमानातून उतरू दिले नसल्याची घटना घडली. या संदर्भातील वृत्त 'ANI' या वृत्तसंस्थेने दिले आहे. (Mumbai To Mauritius Flight)
विमानात बसलेल्या एका प्रवाशाने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, विमान आज (दि.२४) पहाटे ४.३० वाजता उड्डाण करणार होते. त्यासाठी दुपारी ३.४५ वाजता प्रवाशांचा विमानात प्रवेश सुरू झाला. मात्र, त्यानंतर विमानाच्या इंजिनमध्ये समस्या निर्माण झाली. विमानाने उड्डाण न केल्याने प्रवाशांना पाच तास विमानातच बसावे लागले, त्यांना खाली उतरू दिले नाही, असेदेखील एका प्रवाशाने ANI ला दिलेल्या माहितीत सांगितले. (Mumbai To Mauritius Flight)
हेही वाचा: