Indigo Flight : मुंबईहून गुवाहाटीला जाणाऱ्या विमानाचे ढाक्‍यात इमर्जन्सी लँडिंग; काॅंग्रेस नेत्‍याचाही समावेश | पुढारी

Indigo Flight : मुंबईहून गुवाहाटीला जाणाऱ्या विमानाचे ढाक्‍यात इमर्जन्सी लँडिंग; काॅंग्रेस नेत्‍याचाही समावेश

मुंबई ; पुढारी वृत्‍तसेवा मुंबईहून गुवाहाटीला जाणारी इंडिगोची फ्लाईटचे ढाकामध्ये इमर्जन्सी लँडिग करण्यात आले. ढाकाहून गुवाहाटीपर्यंत जाण्याकरीता आता पर्यायी चालकदलाची व्यवस्था केली जात आहे. विमानातील प्रवाशांना या विषयी माहिती देण्यात आली असून, त्‍यांना विमानातच जेवणाची व्यवस्‍था करण्यात आली आहे. या फ्लाईटमध्ये एक काँग्रेसच्या नेत्‍याचाही समावेश आहे.

मुंबईहून गुवाहाटीला जाणारे इंडिगो विमान आसामच्या गुवाहाटीमधील खराब वातावरणामुळे लॅँडिंग करू शकले नाही. परिणामी या   फ्लाईट ६ ई ५३१९ ला बांगलादेशच्या ढाका च्या दिशेने वळवण्यात आले अन् विमानाचे बांगलादेशच्या ढाका येथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

हेही वाचा :  

Back to top button