आगतळा : त्रिपुरातील कमालपूरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विश्वतोष धर यांच्याविरुद्ध बलात्कार पीडितेचा लैंगिक छळ केल्याची तक्रार करण्यात आली आहे. जबाब नोंदविण्यासाठी पीडिता धर यांच्या दालनात गेली होती. त्यावेळी आपल्याला धर यांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.
यासंदर्भात लेखी तक्रार प्राप्त झाली असली तरी अजून गुन्हा नोंदविण्यात आली नाही, असे पोलिसांनी सांगितले. सध्या धलाई जिल्हा-सत्र न्यायाधीश गौतम सरकार यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या समितीने न्यायाधीशांवरील आरोपांची चौकशी सुरू केली आहे. पीडितेसोबत एक महिला कॉन्स्टेबलही न्यायाधीशांच्या दालनात गेली होती. मात्र आरोपी न्यायाधीशांनी तिला तिच्यासोबत राहू दिले नाही.