Arvind Kejriwal | ‘पुढच्या वेळी मी स्वतः येईन…’;मुख्यमंत्री केजरीवालांची कोर्टात व्हर्च्युली हजेरी | पुढारी

Arvind Kejriwal | 'पुढच्या वेळी मी स्वतः येईन...';मुख्यमंत्री केजरीवालांची कोर्टात व्हर्च्युली हजेरी

पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात आपचे राष्ट्रीय निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना वारंवार ईडीकडून समन्स पाठवण्यात आले होते. मात्र ईडीच्या समन्सवर ते हजर न राहिल्याने तपास यंत्रणा न्यायालयात गेली होती. या प्रकरणी राऊस अव्हेन्यू कोर्टाने त्यांना आज न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र दिल्ली विधानसभेचे कामकाज सुरू असून त्यांनी या सुनावणीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली. दरम्यान, त्यांनी पुढील सुनावणीसाठी स्वत: उपस्थित राहणार असल्याचे म्हटले आहे. (Arvind Kejriwal)

पुढच्या वेळी मी स्वत: उपस्थित राहीन- केजरीवाल

ईडी समन्स प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर झाले. या ठिकाणी त्यांनी हजर राहून आपले म्हणणे मांडले आणि न्यायालयाला ‘पुढच्यावेळी मी सुनावणीला स्वतः येईन’ असे वचनही दिले आहे. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने शनिवार १६ मार्च ही पुढील तारीख दिली आहे. (Arvind Kejriwal)

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने सुनावणीला ऑनलाईन हजेरी

आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वतीने ज्येष्ठ वकील रमेश गुप्ता न्यायालयात हजर होते. दरम्यान मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर झाले. यावेळी यावर केजरीवाल यांचे वकील रमेश गुप्ता म्हणाले, कोर्टात हजर राहिल्याने सर्वांनाच त्रास होईल. यासोबतच दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून आज फ्लोअर टेस्टही आहे. मात्र ते स्वतः व्हर्च्युली कोर्टात हजर राहणार आहेत, असे देखील त्यांनी स्पष्ट केले. (Arvind Kejriwal)

हेही वाचा:

Back to top button