नवी दिल्ली ः दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना बुधवारी दिल्ली मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने सहाव्यांदा समन्स बजावले आहे. ( Arvind Kejriwal vs ED )
अरविंद केजरीवाल यांना येत्या 19 रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. निवडणुकीत प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी समन्स बजावण्यात आल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. या प्रकरणात समन्स बजावल्यानंतर ईडीने 3 फेब्रुवारी रोजी राऊस अॅव्हेन्यू न्यायालयात केजरीवाल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.