Arvind Kejriwal On BJP : ‘भाजपमध्ये सहभागी होण्यासाठी माझ्यावर दबाव’ : केजरीवालांचा खळबळजनक दावा | पुढारी

Arvind Kejriwal On BJP : 'भाजपमध्ये सहभागी होण्यासाठी माझ्यावर दबाव' : केजरीवालांचा खळबळजनक दावा

पुढारी ऑनलाईन डेस्क: भाजपमध्ये सहभागी होण्यासाठी माझ्यावर आणि माझ्या आपच्या आमदारांवर दबाब टाकला जात आहे, असा खळबळजनक दावा आम आदमी पार्टीचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. आज (दि.४) दिल्लीतील एका कार्यक्रमात ते बोलत होते.  मी झुकणार नाही. दबावाला बळी पडून भाजपमध्ये सामील होणार नाही, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भाजपवर गंभीर आरोप करणे भोवले आहे. भाजपवर केजरीवालांनी प्रत्येकी २५ कोटीला आप आमदारांना विकत घेण्याची ऑफर भाजपकडून मिळाल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी सलग दोनवेळा दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडून केजरीवालांना नोटीस देण्यात आली होती. यासाठी स्वत: दिल्ली पोलिसांची टीम केजरीवाल यांच्या शासकीय निवासस्थानी पोहचले होते. मात्र केजरीवाल यांनी दिल्ली पोलिसांकडून स्वत: ही नोटीस स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी दिल्ली सीएमओला ही नोटीस पाठवली.

‘केजरीवाल उत्तर द्या…’; दिल्ली मुख्यमंत्र्यांना नोटीस

भाजपने आप आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी (दि.४) आणि त्यापूर्वी एकदा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस पाठवली. या नोटीसमध्ये केजरीवाल यांना सोमवार ५ फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्‍याचे  नमूद करण्‍यात आले आहे.

हेही वाचा:

Back to top button