PM Modi : पंतप्रधान मोदी आज १ लाखांहून अधिक तरूणांना देणार नियुक्तीपत्र | पुढारी

PM Modi : पंतप्रधान मोदी आज १ लाखांहून अधिक तरूणांना देणार नियुक्तीपत्र

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज (दि.१२) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळाव्यात (RozgarMela) केंद्र सरकारच्या विभागांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या १ लाखांहून अधिक नियुक्ती पत्रांचे वाटप करणार आहेत. यावेळी पंतप्रधान येथे एकात्मिक संकुल “कर्मयोगी भवन” च्या पहिल्या टप्प्याची पायाभरणी करतील. हे कॉम्प्लेक्स मिशन कर्मयोगीच्या विविध स्तंभांमध्ये सहयोग आणि समन्वयाला प्रोत्साहन देईल.

पंतप्रधान मोदी (PM Modi) आज सकाळी १०:३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नव्याने भरती झालेल्या १ लाखांहून अधिक नियुक्ती पत्रांचे वाटप करतील, असे पंतप्रधान कार्यालयाने (PMO) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. देशभरात ४७ ठिकाणी रोजगार मेळा (RozgarMela) आयोजित करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये ही भरती होत आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकार या उपक्रमाला पाठिंबा देत आहेत. महसूल विभाग, गृह मंत्रालय, उच्च शिक्षण विभाग, अणुऊर्जा विभाग, संरक्षण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग, आरोग्य मंत्रालय, यासह विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये या नवीन भरती करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button