Cisco Layoffs | ‘ले ऑफ’ची टांगती तलवार! ‘या’ दिग्गज कंपनीचा हजारो कर्मचाऱ्यांना नारळ, कारण काय?

Cisco Layoffs | ‘ले ऑफ’ची टांगती तलवार! ‘या’ दिग्गज कंपनीचा हजारो कर्मचाऱ्यांना नारळ, कारण काय?

पुढारी ऑनलाईन : २०२४ वर्षातही जगातील अनेक कंपन्या नोकरकपात करत आहेत. आता जगातील सर्वात मोठ्या नेटवर्किंग आणि सॉफ्टवेअर कंपनीपैकी एक सिस्कोने आता नोकरकपात करण्याची तयारी केली आहे. सिस्कोने त्यांच्या व्यवसायाची पुनर्रचना करण्याची योजना आखली आहे. परिणामी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले जाणार आहे. ही कंपनी उच्च-वाढीच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करू इच्छित असल्याचे सुत्रांनी म्हटले आहे. (Cisco Layoffs)

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सिस्को येत्या काही दिवसांत नोकरकपात करण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेतील सर्वात मोठ्या या नेटवर्किंग कंपनीने नोकरकपातीची टांगती तलवार लटकवल्याने हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाऊन ते बेरोजगार होण्याचा भीती आहे. पण, कंपनीने नेमक्या किती कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले जाणार याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही.

सॅन जोस, कॅलिफोर्निया येथील या कंपनीच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२३ पर्यंत त्यांची एकूण कर्मचारी संख्या ८४,९०० आहे. कंपनी अजूनही एकूण किती कर्मचाऱ्यांना कमी करणार आहे यावर निर्णय घेत असल्याचे सुत्रांनी सांगितले. पुढील आठवड्याच्या सुरुवातीस कंपनीकडून एक घोषणा होऊ शकते, कारण कंपनी १४ फेब्रुवारी रोजी त्यांचा कमाई अहवाल सादर करणार आहे.

नोव्हेंबर २०२२ मध्ये Cisco ने अर्निंग कॉलदरम्यान पुनर्रचनेचा निर्णय जाहीर केला होता. त्यावेळी त्यांच्या सुमारे ५ टक्के कर्मचाऱ्यांचा याचा परिणाम झाला होता.

टेलिकॉम मेकर्स नोकिया आणि एरिक्सनसह टेक कंपन्यांनी खर्च कमी करण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षी हजारो नोकऱ्या कमी केल्या होत्या. Amazon, Alphabet आणि Microsoft सारख्या अनेक मोठ्या टेक कंपन्यांनी अलीकडील काही दिवसांत नोकरकपात केली होती. आता सिस्कोने नोकरकपातीची तयारी केली आहे. यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना याचा फटका बसणार आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news