Jharkhand Accident : पोलिसांच्या बसची दुचाकीला धडक; नववीत शिकणाऱ्या मुलीचा मृत्यू | पुढारी

Jharkhand Accident : पोलिसांच्या बसची दुचाकीला धडक; नववीत शिकणाऱ्या मुलीचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : झारखंडच्या देवघर जिल्ह्यात पोलिसांच्या बसने दुचाकीला धडक दिल्याने नववीत शिकणाऱ्या मुलीचा मृत्यू झाला. तर दोन विद्यार्थी जखमी झाले. टाऊन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कॅस्टेयर्स टाऊन येथील डीएव्ही शाळेजवळ शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.

या घटनेनंतर स्थानिकांनी आक्रमक होत बसची तोडफोड केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याचा आरोप आहे. देवघरचे उपायुक्त विशाल सागर यांनी सांगितले की, अपघात झाला तेव्हा एक व्यक्ती त्याच्या दुचाकीवरून तीन विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात होता. दुचाकीला बसने पाठीमागून धडक दिली. बस झारखंड सशस्त्र पोलिस दलाची असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला, तर इतर दोन विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत. बसच्या चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा : 

Back to top button