

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटकात 'हुक्का'च्या विक्री आणि सेवनावर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे. हुक्का धुमप्रान आणि त्यांचे आरोग्याला होणारे धोके लक्षात घेत, कर्नाटक सरकारने हुक्का धूम्रपानावर राज्यव्यापी बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. असे कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे. या संदर्भातील माहिती एएनआयने दिली आहे. (Ban On Hookah in Karnataka)
ANI वृत्तसंस्थेने म्हटले आह की, कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी राज्यातील सार्वजनिक आरोग्य आणि तरुणांचे रक्षण करण्यासाठी राज्यव्यापी हुक्का बंदीची घोषणा केली आहे. ही निर्णायक कृती WHO च्या ग्लोबल ॲडल्ट टोबॅको सर्व्हे-2016-17 (GATS-2) मधील चिंताजनक डेटाच्या आधारांवर करण्यात आली आहे, असे देखील आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे. (Ban On Hookah in Karnataka)
WHO च्या ग्लोबल ॲडल्ट टोबॅको सर्व्हे-2016-17 मध्ये कर्नाटकातील 22.8 टक्के प्रौढ लोक तंबाखूचे सेवन करतात आणि 8.8 टक्के धूम्रपान करतात, असे नमूद केले आहे. अहवालात पुढे असे दिसून आले आहे की 23.9 टक्के प्रौढ लोक सार्वजनिक ठिकाणी धुराच्या संपर्कात येतात, यामुळे राज्यातील तंबाखूच्या सेवनाचा येथील लोक आणि त्यांच्या आरोग्यावर व्यापक धोका निर्माण होतो. त्यामुळे कर्नाटक राज्य सरकारकडून हे म्हत्त्वाचे पाऊल उचलले आहे.