Interim Budget Updates Live | ४० हजार रेल्वे कोच 'वंदे भारत'मध्ये बदलणार - निर्मला सीतारामन | पुढारी

Interim Budget Updates Live | ४० हजार रेल्वे कोच 'वंदे भारत'मध्ये बदलणार - निर्मला सीतारामन

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प (अर्थसंकल्प 2024) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला.  (Interim Budget 2024 Updates Live)

Interim Budget Updates Live – 

* समाजातील सर्व घटकांच्या हिताचा अर्थसंकल्प – निर्मला सीतारामन

* ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात विकास 

* प्रत्येक नागरिकाला वीज, पाणी योजनांचा लाभ 

* १० वषार्षात देशाच्या विकासात अनेक मोठे बदल 

* भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मोदी सरकारचे यश

* पीएम विश्वकर्मा योजनेचा सर्वाधिक लाभ

* देशवासियांना मोदी सरकारवर विश्वास आहे

* राष्ट्रीय शिक्षण धोरणाने शिक्षण क्षेत्रात बदल केले

* २५ कोटी लोकांची दारिद्र्यातून मुक्तता

* पीएम मुद्रा योजनेमुळे नव्या उद्योजकांना फायदा

* नव्या तरुण योजनांना सरकारी योजनांचा फायदा

* महिलांना ३० कोटी मुद्रा कर्ज देण्यात आलं 

 * २०४७ पर्य़ंत भारत विकसित देश होणार

* देशात नव्या ३ हजार नव्या आयटीआयची स्थापना

* ८० कोटी नागरिकांना मोफत धान्य वितरण

* अत्याधुनिक विकास हे विकसित भारताचं उद्दिष्ट्य

* २०४७ पर्य़ंत भारत विकसित देश होणार

* आवास योजनेंतर्गत ५ वर्षात नवी २ कोटी घरं

* १ कोटी गरिबांना ३०० युनिट मोफत वीज 

* मिशन इंद्रधनुष्य योजना राबवणार

* आशा वर्कर्सना आयुष्मान भारत योजनेचा लाभ

* शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न 

* महिला आरक्षण, तिहेरी तलाकमुळे महिलांना लाभ 

* शेती क्षेत्रातून ३ लाख कोटींचा व्यापार

* पीएम आवास योजनेची ७० टक्के घरे 

* ३९० नवी कृषी विद्यापीठे सुरु 

* १५ नवी एम्स रुग्णालये सुरु करणार

* मत्स्य निर्यातीसाठी १ लाख कोटींची तरतूद 

* देशात ५ मत्स्यालये उभारणार

* लखपती दीदी योजनेनं आत्मनिर्भरता

* जय जवान, जय  विज्ञान, जय अनुसंधान

* शेतकऱ्यांना व्याजमुक्त कर्जासाठी १ लाख कोटी  

* स्कील इंड्यासाठी १.४ कोटींची तरतूद

* १० वर्षात देशात विमानतळे दुपटीने वाढली

* देशात १ हजार नवीन फायटर विमाने

* शहरीकरणात मेट्रोचा मोठा वाटा

* जनतेचं सर्वसाधारण उत्पन्न ५० टक्क्यांनी वाढलं

 * ई- बसेसची संख्या वाढवणार

* ४० हजार रेल्वे कोच वंदे भारतमध्ये बदलणार

*बायो इंधनाच्या निर्मितीवर भर देणार

* देशाच्या हरित विकासावर भर देणार

* ३ रेल्वे कॉरिडॉर सुरु करणार

* इलेक्ट्रीक वाहनांना चालना

* देशात धार्मिक पर्यटनावर भर देणार

* सर्व विभागांचा देशाच्या विकासात वाटा

* १० वर्षात ५९६ अब्ज डॉलर परकीय गुंतवणूक

* देशात गायींची संख्या वाढवणार

* ७ लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त

* सुरक्षा क्षेत्रात आत्मनिर्भरता आणणार

* औद्योगिक करात ३० टक्क्यावरून २० टक्के

* स्थानिक कंपन्यांसाठी १५ टक्के कर

* कर परतावा १० दिवसात मिळणार

* २०१३ मध्ये कर परताव्यासाठी ९४ दिवस

* ३ टक्क्यांपर्यंत कर पात्र उत्पन्न वाढवलं

* कार्पोरेट टॅक्स ३० टक्क्यांवरून २० टक्के 

* कार्पोरेट टॅक्स ३० टक्क्यांवरून २० टक्के

* आयकर रचनेत कोणताही बदल नाही – निर्मला सीतारामन

निवडणूक वर्षात पूर्ण अर्थसंकल्पाऐवजी अंतरिम अर्थसंकल्प मांडला जातो. तसेच अंतरिम अर्थसंकल्पात धोरणात्मक घोषणा टाळल्या जातात. अं

निर्मला सीतारामन यांच्यासह राज्यमंत्री डॉ भागवत किशनराव कराड आणि पंकज चौधरी आणि वित्त मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली.

पूर्ण बजेट आणि अंतरिम बजेटमध्ये नेमका फरक काय?

बजेटमध्ये महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे मागील वर्षात मिळालेले उत्पन्न आणि खर्च आणि पुढील वर्षीचे अपेक्षित खर्च. पण अंतरिम बजेटमध्ये मागील वर्षाचे उत्पन्न, खर्च यांचा लेखाजोखा मांडला जातो. पण पुढील खर्चाला मंजुरी घेताना निवडणुका होईपर्यंतच्या आवश्यक तेवढ्या खर्चाला मंजुरी घेतली जाते. सरकार त्यांच्या उरलेल्या कालावधीसाठी बजेट सादर करते, तर उर्वरित वर्षासाठीचा अर्थसंकल्प निवडणुकानंतर येणारे सरकार सादर करते.

हेही वाचा

Back to top button