Union Budget 2024: बजेट २०२४ बद्दल अर्थमंत्री सीतारामन यांचे मोठे वक्तव्य; कोणत्याही चमकदार योजना असणार नाहीत, फक्त… | पुढारी

Union Budget 2024: बजेट २०२४ बद्दल अर्थमंत्री सीतारामन यांचे मोठे वक्तव्य; कोणत्याही चमकदार योजना असणार नाहीत, फक्त...

पुढारी ऑनलाईन डेस्क: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी एका कार्यक्रमात २०१४ च्या बजेटबद्दल मोठे वक्तव्य केले आहेआगामी २०२४ चा अर्थसंकल्पात कोणत्याही महत्त्वाच्या किंवा चमकदार घोषणा केल्या जाणार नाहीत. १ फेब्रुवारी रोजी केवळ ‘लेखानुदान’ अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे, असे स्पष्टीकरण सीतारामन यांनी दिले आहे. नवी दिल्लीतील भारतीय उद्योग परिसंघाच्या आयोजित कार्यक्रमात आज (दि.७) त्या बोलत होत्या. (Union Budget 2024)

नवी दिल्लीतील सीआयआयच्या ग्लोबल इकॉनॉमिक पॉलिसी फोरम 2023 मध्ये बोलताना सीतारामन म्हणाल्या, एनडीए सरकारकडून १ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात कोणत्याही “नेत्रदीपक घोषणा” होण्याची शक्यता नाही. जुलै, २०२४ पूर्वी लोकसभा निवडणुकांनंतर नियमित बजेट जुलैमध्ये असणार आहे, त्यामुळे जनतेला तोपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, असेही त्या म्हणाल्या. (Union Budget 2024)

Union Budget 2024: काय आहे ‘लेखानुदान’ अर्थसंकल्प

अर्थमंत्री सीतारामन यांनी १ फेब्रुवारीला केवळ व्होट ऑन अकाउंट (The vote on account) अर्थसंकल्प मांडला जाणार असून, जुलैमध्ये नियमित अर्थसंकल्प मांडला जाणार असल्याचे त्या म्हणाल्या. व्होट ऑन अकाउंट हा एक अंतरिम अर्थसंकल्प आहे. ज्याद्वारे सत्तेत असणारे सरकार नवीन सरकार येईपर्यंत आवश्यक खर्चासाठी संसदेची मंजूरी घेते. तसेच पुढील सरकार येईपर्यंत खर्च भागवणारा हा अर्थसंकल्प आहे, असे मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button