Bihar Politics Crisis : ...तरीही इंडिया आघाडी भक्कम; नितीशकुमार यांच्या निर्णयानंतर काँग्रेसची प्रतिक्रिया | पुढारी

Bihar Politics Crisis : ...तरीही इंडिया आघाडी भक्कम; नितीशकुमार यांच्या निर्णयानंतर काँग्रेसची प्रतिक्रिया

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा नितीशकुमार यांनी काही दिवसांपासून सुरू असलेल्या अटकळींना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असून भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (रालोआ) सहभागी होत सरकार स्थापणार आहेत. नितीशकुमार यांच्या या निर्णयानंतर काँग्रेसकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

नितीशकुमारांच्या या ‘यू टर्न’ने इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. याआधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी ‘एकला चलो रे’चा नारा दिला होता. लोकसभा निवडणुकीच्या आधी एकीकडे भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडी फुटीच्या मार्गावर आहे. इंडिया आघाडीबाबत काँग्रेसचे खासदार जयराम रमेश म्हणतात की, “इंडिया आघाडी भक्कम आहे. इथे काही स्पीड ब्रेकर्स आहेत. पण आम्ही भाजपविरोधात एकजुटीने लढू. द्रमुक, राष्ट्रवादी, टीएमसी आणि सपा हे सर्व पक्ष एकत्र लढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

“नितीश कुमार यांनी १८ जून २०२३ रोजी पाटणा येथे विरोधी पक्षांची पहिली बैठक बोलावली होती. दुसरी बैठक १७-१८ जुलैला बेंगळुरूमध्ये झाली होती. त्यानंतर पुन्हा ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत बैठक झाली. तिन्ही सभांमध्ये नितीश कुमार यांची प्रमुख भूमिका होती. त्यामुळे आम्ही नितीश कुमार यांच्यासोबत भाजप आणि त्यांच्या विचारसरणी विरूद्ध शेवटपर्यंत लढण्याचा विचार करत होतो,” असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button