Bihar Politics: बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग, बैठकांचा सिलसिला सुरू | पुढारी

Bihar Politics: बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग, बैठकांचा सिलसिला सुरू

पुढारी ऑनलाईन डेस्क: बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू सर्वेसर्वा नितीशकुमार हे पुन्हा एकदा भाजपसोबत संसार थाटणार आहेत? या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. येथील स्थानिक पक्ष ‘जेडीयू’ आणि ‘भाजप’ यांच्या राजकीय बैठकांचा सिलसिला सुरू आहे. तर दुसरीकडे ‘राजद’ हा तटस्थ भूमिकेत दिसत आहे. (Bihar Politics)

पाटणा येथील मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी जेडीयू आमदार आणि पक्षाच्या नेत्यांची बैठक सुरू झाली. दुसरीकडे भाजपच्या पक्ष कार्यालयात बिहार भाजप आमदार आणि पक्षाच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. तर या बैठकीला विधीमंडळ पक्षाचे नेते देखील सहभागी झाले आहेत. बिहारमधील लालू प्रसाद यादव यांच्या ‘राजद’ पक्षाचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. (Bihar Politics)

राजभवनाबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी JD(U)ची बैठक सुरू आहे. दरम्यान, पाटणा येथील भाजप प्रदेश पक्ष कार्यालयात भाजप विधीमंडळ पक्षाची बैठक सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पाटणा येथील बिहार राजभवनाबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नितीशकुमार यांनी राज्यपालांना भेटण्याची वेळ मागीतली

जनता दल संयुक्‍तचे (जेडीयू) सर्वेसर्वा आणि बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) हे राष्‍ट्रीय जनता दल (आरजेडी) साथ सोडत पुन्‍हा एकदा भाजपबरोबर सरकार स्‍थापन करणार असल्‍याच्‍या चर्चेला उधाण आले आहे. विरोधी इंडिया आघाडीचे शिल्पकार असलेले नितीश आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ शकतात आणि भाजपच्या पाठिंब्याने नवीन सरकार स्थापन करू शकतात. त्यांनी आज सकाळी राज्यपालांना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे.

हेही वाचा:

Back to top button