Mizoram News: लेंगपुई विमानतळावर बर्मी लष्कराचे विमान कोसळले

Mizoram News: लेंगपुई विमानतळावर बर्मी लष्कराचे विमान कोसळले

मिझोराम, पुढारी ऑनलाईन : लेंगपुई विमानतळावर बर्मी लष्कराचे विमान आज (दि.२३) सकाळी कोसळले. या अपघातात ६ जण जखमी झाले आहेत. या विमानात वैमानिकासह १४ जण होते. जखमींना लेंगपुई रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिझोरमच्या पोलिसांनी दिली.

मिझोरामच्या लेंगपुई विमानतळावर मंगळवारी म्यानमारचे लष्करी विमान धावपट्टीवरून घसरले. लष्करी विमान त्या म्यानमारच्या लष्करी जवानांना एअरलिफ्ट करण्यासाठी आले होते. लेंगपुई येथील टेबलटॉप धावपट्टी आव्हानात्मक मानली जाते. म्यानमारचे विमान शांक्सी Y-8 लँडिंगच्या वेळी धावपट्टीवरून घसरले आणि त्याचे दोन तुकडे झाले.

भारताने सोमवारी म्यानमारच्या किमान १८४ सैनिकांना मायदेशी पाठवले होते. आसाम रायफल्सने जारी केलेल्या अधिकृत निवेदनाने पुष्टी केली आहे की म्यानमारचे एकूण 276 सैनिक गेल्या आठवड्यात मिझोराममध्ये दाखल झाले होते. आणि सोमवारी त्यापैकी 184 जणांना म्यानमारला परत पाठवण्यात आले होते.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news