Groww app डाऊन! मोठा फटका बसल्याच्या यूजर्संच्या तक्रारी

Groww app डाऊन! मोठा फटका बसल्याच्या यूजर्संच्या तक्रारी

पुढारी ऑनलाईन : ऑनलाइन फायनान्सियल सर्व्हिसेस प्लॅटफॉर्म Groww app आज मंगळवारी डाऊन झाले. यामुळे यूजर्संना इंट्राडे ट्रेडसाठी लॉग इन करताना अॅपला अनेक समस्या आल्या. याबाबतच्या तक्रारी यूजर्संनी X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत नोंदवल्या.
"आज, मार्केट उघडले पण माझे Groww ॲप उघडले नाही. माझी वॉचलिस्ट दोन दिवसांपूर्वी उघडली नव्हती. माझ्या ओपन पोझिशन्सची मुदत संपणार आहे. आता माझे नुकसान कोण भरेल," असे एका यूजर्सने X वर म्हटले आहे.

दुसर्‍या एका यूजर्सने म्हटले, "Groww app @_groww काम करत नाही. अनेकवेळा प्रयत्न केला. फ्लाइट मोड केला आणि नंतर चालू केले तरीही काम करत नाही. त्यांचा प्रोडक्शन सर्व्हर डाउन आहे असे दिसते. कृपया याचे निराकरण करा."

"पीक ट्रेडिंग वेळेत Groww ॲपची ही स्थिती आहे. या नुकसानासाठी कोण जबाबदार असेल?," असा सवाल एका यूजर्सने केला आहे.

यावर Groww ने खुलासा केला आहे. "आम्ही गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत. आमची टीम तांत्रिक समस्येचे निराकरण करत आहे आणि त्याचे त्वरित निराकरण करण्यासाठी काम करत आहे. आम्ही लवकरच सामान्य ऑपरेशन्सवर परत येऊ. तुम्ही समजून घेतल्याबद्दल धन्यवाद." असे Groww ने म्हटले आहे.

ऑक्टोबर २०२३ मध्ये, Groww ने सक्रिय गुंतवणूकदारांच्या संख्येच्या बाबतीत Zerodha ला मागे टाकले होते. ताज्या आकडेवारीनुसार, Groww कडे ७६ लाख सक्रिय ग्राहक आहेत तर Zerodha कडे ६७.३ लाख आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news