पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायली सैन्याने गाझामधील खान युनूस या दक्षिणेकडील शहरावर हल्ला केला. या ह्ल्ल्यात सुमारे ६५ हून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे, तर हजारो नागरिकांना पळून जावे लागले. इस्रायल-हमास युद्धामुळे आतापर्यंत गाझाच्या २.३ दशलक्ष रहिवाशांपैकी सुमारे ८५ टक्के लोक विस्थापित झाले आहेत.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मात्र हमासवर 'संपूर्ण विजय' होईपर्यंत आक्रमण सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. गाझामध्ये अजूनही बंदिस्त असलेल्या सुमारे १०० ओलिसांना परत करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, अमेरिकेने मात्र निरपराधांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे.
७ ऑक्टोबरपासून गाझावरील इस्रायली हल्ल्यात किमान २५ हजार २९५ लोक मारले गेले आहेत, तर ६३ हजारहून अधिक जखमी झाले. ७ ऑक्टोबरच्या हमासच्या हल्ल्यात इस्रायलमधील १ हजार १३९ नागरिकांचा मृत्यू झाला.
हेही वाचा :