व्रतस्‍थ रामभक्‍त..! झमेली बाब तब्‍बल ३१ वर्षांनंतर प्राणप्रतिष्ठादिनी करणार अन्नग्रहण!

अयोध्‍येत रामलल्‍ला प्राणप्रतिष्‍ठादिनी झमेली बाब अन्‍नग्रहण करणार आहेत.
अयोध्‍येत रामलल्‍ला प्राणप्रतिष्‍ठादिनी झमेली बाब अन्‍नग्रहण करणार आहेत.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : प्रभू श्रीराम त्‍यांच्‍या घरात प्रवेश करतील त्‍याच दिवशी स्‍वत:च्‍या हाता अन्‍न शिजवेन आणि खडे मीठ खाऊन आपला नवस सोडणार, अशी शपथ दरभंगा जिल्ह्यातील बहादूरपूर तालुक्‍ताील खैरा गावातील रहिवासी वीरेंद्र कुमार बैठा उर्फ ​​झमेली बाबा ( Zameli Baba )  यांनी घेतली होती. तब्‍बल ३१ वर्ष ते फळे खाऊन आपले जीवन जगत आहे. आता २२ जानेवारी रोजी त्‍यांचे स्‍वप्‍न पूर्ण होत आहे. अयोध्‍येत रामलल्‍ला प्राणप्रतिष्‍ठादिनी झमेली बाब अन्‍नग्रहण करणार आहेत. ( Zameli Baba Will Consume Food On The Day Of Pran Pratishtha Ceremony )

७ डिसेंबर १९९२ राेजी केला हाेता अन्‍नग्रहणाचा त्‍याग

वीरेंद्र कुमार बैठा उर्फ ​​झमेली बाबा हे लहानपणापासून राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत आहेत. विश्व हिंदू परिषदेच्या आवाहनावरून ते दरभंगा येथून सुमारे अडीचशे कारसेवकांसह अयोध्येला रवाना झाले होते. राम मंदिर आंदोलनात झमेली बाबा सक्रीय होते. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्‍येमधील बाबरीचा वादग्रस्त ढाचा पाडण्यातही ते आघाडीवर होते. बाबरीचा ढाचा पाडल्‍यानंतर ७ डिसेंबर १९९२ राजी त्‍यांनी अन्‍नग्रहणाचा त्‍याग केला. प्रभू श्रीराम त्‍यांच्‍या घरात प्रवेश करतील त्‍याच दिवशी अन्‍न ग्रहण करेन, अशी शपथ त्‍यांनी घेतली. यानंतर त्‍यांनी एक पान दुकान चालवत आपला उदरनिर्वाह करत आहेत. ते अविवाहत असून मी माझे आयुष्‍य समाजासाठी समर्पित केल्‍याचे ते सांगतात. ( Zameli Baba Will Consume Food On The Day Of Pran Pratishtha Ceremony )

अयोध्‍येतमधील एका फोटो स्‍टुडिओत त्‍यांनी फोटा काढला. यावेळी स्‍टुडिओ मालकाने त्‍यांना नाव आणि पत्ता विचारत फोटो पोस्‍टाने पाठवतो असे सांगितले. कहाी दिवसांनी त्‍यांना अयोध्‍येतील राम मंदिर आंदोलनावेळी काढलेला फोटा मिळाला. त्‍यांनी हा फोटो आजही जतन केल्‍याचे ते सांगतात. आता २२ जानेवारी रोजी झमेली बाबा यांचे राम मंदिराचे स्‍वप्‍न वास्‍तवात उतरणार आहे. त्‍या दिवशी ते तब्‍बल ३१ वर्षानंतर अन्‍नग्रहण करणार असून त्‍यांच्‍या अनोख्‍या उपवास हा चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news