प्राणप्रतिष्‍ठा सोहळा : राम मंदिर गर्भगृहात PM मोदींसह 'हे' चार पाहुणे राहणार उपस्‍थित | पुढारी

प्राणप्रतिष्‍ठा सोहळा : राम मंदिर गर्भगृहात PM मोदींसह 'हे' चार पाहुणे राहणार उपस्‍थित

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. 22 जानेवारी रोजी होणार्‍या या सोहळ्यात राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा तीन तासांपेक्षा जास्त काळ चालणार आहे. या काळात गर्भगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यासह केवळ पाच विशेष पाहुणे उपस्थित राहणार आहेत. इतर लोकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांनी आज (दि.१५) दिली. ( Ayodhya Ram Mandir Pran pratishtha ceremony)

प्राणप्रतिष्ठा दुपारी 12:20 वाजता सुरू होईल आणि ती दुपारी 1 वाजेपर्यंत पूर्ण होईल असा अंदाज आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यासह सरसंघचालक मोहन भागवत, राज्यपाल आनंदी बेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, श्री रामजन्मभूमी क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास उपस्थित राहणार आहेत, असेही चंपत राय यांनी सांगितले. ( Ayodhya Ram Mandir Pran pratishtha ceremony)

राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रमासाठी सात हजारांहून अधिक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. निमंत्रण पत्र देण्यापूर्वी ही माहिती टपाल खात्यामार्फत साधूसंतांनाही पाठवण्यात आली. यामध्ये कार्यक्रमादरम्यान घ्यावयाच्या खबरदारीबाबतही माहिती देण्यात आली आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगता दुपारी 1 वाजेपर्यंत होणे अपेक्षित आहे. कार्यक्रमानंतर पंतप्रधान आणि अन्‍य मान्‍यवर आपले विचार व्यक्त करतील, असेही चंपत राय यांनी सांगितले. ( Ayodhya Ram Mandir Pran pratishtha ceremony)

हेही वाचा : 

 

 

 

 

Back to top button