Ayodhya Ram Temple: अयोध्या राम मंदिर ‘या’ तारखेपासून सर्वसामान्यांच्या दर्शनासाठी खुले | पुढारी

Ayodhya Ram Temple: अयोध्या राम मंदिर 'या' तारखेपासून सर्वसामान्यांच्या दर्शनासाठी खुले

पुढारी ऑनलाईन डेस्क: उ.प्रदेशातील अयोध्या राम मंदिरात सोमवार २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी २१ जानेवारीपर्यंत याठिकाणी धार्मिक विधी सुरू आहेत. त्यानंतर मंगळवारी २३ जानेवारीपासून राम मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले होणार असून, त्यांना रामलल्लाचे दर्शन घेता येणार आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Ayodhya Ram Temple)

रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा विधीचा आज (दि.१७) दुसरा दिवस. अयोध्येत मंगळवारपासून भगवान श्री रामलल्ला प्राणप्रिष्ठा विधीला सुरूवात झाली आहे. प्रायश्चित्त पूजा आणि कर्मकुटी पूजा संपन्न झाली. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य आणि प्राणप्रतिष्ठाचे मुख्य यजमान डॉ.अनिल मिश्रा यांच्या हस्ते विधी पार पडले. आज रामलल्लाची मूर्ती मंदिर परिसरात प्रवेश करणार असून, या मूर्तीचे परिसर भ्रमण केले जाणार असल्याची माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने दिले आहे.

प्राणप्रतिष्ठा साेहळ्यातील धार्मिक विधी

१७ जानेवारी – मूर्तीचा मंदिर परिसरात प्रवेश
१८ जानेवारी – तीर्थपूजन, जलाधिवास आणि गंधाधिवास
१९ जानेवारी – औषधाधिवास, केसराधिवास, घृताधिवास आणि धनाधिवास
२० जानेवारी – शर्कराधिवास, फलधिवास, पुष्पाधिवास
२१ जानेवारी – मध्याधिवास, सायंकाळ शैय्याधिवास

हेही वाचा:

Back to top button