NEET PG 2024 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखा महत्त्वाच्या | पुढारी

NEET PG 2024 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, 'या' तारखा महत्त्वाच्या

पुढारी ऑनलाईन : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने आज नीट पदव्युत्तर (NEET PG) २०२४ च्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. आज जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार, NEET PG 2024 परीक्षा ७ जुलै २०२४ रोजी घेतली जाईल. NEET PG 2024 च्या पात्रतेसाठी कट-ऑफ तारीख १५ ऑगस्ट २०२४ असेल. याआधी या परीक्षेसाठी ३ मार्च तारीख जाहीर केली होती.

NEET-PG 2024 परीक्षा आधी ३ मार्च २०२४ रोजी घेण्यात येईल, असे अधिसूचित करण्यात आले होते. दरम्यान, राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय परीक्षा (नॅशनल एक्झिट टेस्ट-NExT) एक वर्ष उशीराने म्हणजे २०२५ मध्ये तात्पुरत्या स्वरुपात घेणे सुरू होईल. यापूर्वी ही परीक्षा २०२३ मध्ये सुरू करण्यात येणार होती. पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन (सुधारणा) अधिनियम, २०१८ ची जागा घेणार्‍या नवीन नियमांनुसार, विद्यमान NEET PG परीक्षा पदव्युत्तर प्रवेशांसाठी NExT कार्यरत होईपर्यंत सुरू राहील.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) ने “पोस्ट-ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन रेग्युलेशन, २०२३” देखील सादर केले आहे. ज्यामध्ये प्रत्येक जागेसाठी समुपदेशनाच्या सर्व फेऱ्या राज्य किंवा केंद्रीय समुपदेशन प्राधिकरणांद्वारे ऑनलाइन पद्धतीने आयोजित केल्या जातील.

NEET-PG ही विविध MD/MS आणि PG डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एकच प्रवेश परीक्षा आहे. ही पात्रता-कम-रँकिंग परीक्षा राष्ट्रीय वैद्यकीय आयोग कायदा, २०१९ अंतर्गत घेतली जाते.

हे ही वाचा :

 

Back to top button