बायकोवर विकृत शरीरसंबंध लादणे क्रौर्य : केरळ उच्च न्यायालय | पुढारी

बायकोवर विकृत शरीरसंबंध लादणे क्रौर्य : केरळ उच्च न्यायालय

पुढारी ऑनलाईन डेस्क : बायकोवर तिच्या इच्छेशिवाय विकृत शरीरसंबंधासाठी भाग पाडणे म्हणजे शारीरिक आणि मानसिक क्रौर्य असून, या आधारावर घटस्फोट दिला घेता येऊ शकतो, असे निरीक्षण केरळ उच्च न्यायालयाने नाेंदवले. केरळ उच्चन्यालयाच्या दोन न्यायमूर्तींच्या पीठाने हा निकाल दिला आहे. विकृत लैंगिक संबंध म्हणजे काय, याचा खुलासा न्यायमूर्ती अमित रावल, आणि सी. एस. सुधा यांनी या निकालात केला आहे. न्यायमूर्तींनी स्‍पष्‍ट केले की, विकृत लैंगिक संबंध म्हणजे काय याची व्याख्या व्यक्ती सापेक्ष आहे, एखाद्याला जी गोष्ट विकृत वाटेल, ती गोष्ट इतरांना विकृत वाटणार नाही.  (Divorce)

विकृत संबंध म्हणजे काय?

‘”दोन प्रौढ व्यक्ती त्यांच्या संमतीने खासगीत संबंध ठेवतात, हा त्यांची निवड आहे, त्यांनी कसे संबंध ठेवावेत हाही त्यांचा निवडीचा भाग आहे; पण समजा एखाद्या व्यक्तीला जोडीदाराच्या नैसर्गिक मानवी कृती किंवा नैसर्गिक लैंगिक संबंधाच्या विरोधात जाणाऱ्या कृतीवर आक्षेप असेल आणि तरीही अशी कृती त्याच्यावर लादली जात असेल ती कृती मानसिक आणि शारीरिक कौर्य ठरते,” असे न्यायमूर्तींनी या निकालात म्हटले आहे. जर ही कृती वैवाहिक जोडीदारासोबत घडत असेल तर तो घटस्फोटासाठी आधार आहे, असेही न्यायमूर्तींनी स्पष्ट केले आहे.
या प्रकरणात कौटुंबिक न्यायालयाने याचिकाकर्त्या महिलेची घटस्फोटाची मागणी फेटाळली होती, तसेच पतीची वैवाहिक संबंध पुनर्स्थापित करण्याची मागणीही मान्य केली होती. या विरोधात महिलेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. (Divorce)

‘पॉर्न चित्रपटातील कृतीस भाग पाडले’ | Divorce

या प्रकरणातील जोडप्याचे लग्न २००९ला झाले. लग्नाच्या १७ दिवसानंतर नवरा नोकरीसाठी परेदशात केला. या १७ दिवसात नवऱ्याने बायकोला पॉर्न चित्रपटांतील सीन पाहून तशी कृती करण्यास भाग पाडले होते. याला विरोध केल्यानंतर मारहाण केली होती. नवरा परदेशी गेल्यानंतर सासरच्या लोकांनी घरातून बाहेर काढले, असेही या महिलेने म्हटले आहे. नवऱ्याने हे आरोप फेटाळले होते.
या प्रकरणात बायकोने कलम ४९८ अ नुसार नवऱ्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली होती, या खटल्यात बायकोच्या उलट तपासणीत विकृत लैंगिक संबंधाचा उल्लेख आलेला आहे, असे स्‍पष्‍ट  करत केरळ उच्‍च न्‍यायालयाने पत्‍नीची घटस्फोटाची मागणी मान्य केली.

हेही वाचा

Back to top button