Stock Market Closing Bell | नव्या वर्षाची ‘पॉझिटिव्ह’ सुरुवात, सेन्सेक्स, निफ्टीचा नवा उच्चांक, जाणून घ्या टॉप गेनर्स

बीएसई आणि एनएसई
बीएसई आणि एनएसई
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : जागतिक संमिश्र संकेतांदरम्यान आज नववर्ष २०२४ चा पहिला दिवस भारतीय शेअर बाजारासाठी काहीसा सकारात्मक राहिला. सुरुवातीच्या कमजोर सुरुवातीनंतर आज दुपारच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टीने रिकव्हरी केली. यावेळी सेन्सेक्स, निफ्टीने नवीन विक्रमी उच्चांक नोंदवला. निफ्टी पहिल्यांदाच २१,८३० पार झाला. तर सेन्सेक्सने २७५ अंकांनी वाढून ७२,५०० चा टप्पा ओलांडला. त्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी सापट झाले. सेन्सेक्स ३१ अंकांच्या किरकोळ वाढीसह ७२,२७१ वर बंद झाला. तर निफ्टी १० अंकांच्या वाढीसह २१,७४१ वर स्थिरावला.

संबंधित बातम्या 

क्षेत्रीय आघाडीवर हेल्थकेअर आणि PSU बँक प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी वाढले, तर बँक निर्देशांक ०.५ टक्क्यांनी घसरला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपने अनुक्रमे ०.५४ टक्के आणि ०.७३ टक्क्यांने वाढ नोंदवली.

सेन्सेक्स आज ७२,२१८ वर खुला झाला. त्यानंतर तो ७२,५३४ पर्यंत वाढला. सेन्सेक्सवर नेस्ले इंडिया, टेक महिंद्रा, विप्रो, एचसीएल टेक, टाटा मोटर्स, आयटीसी, इन्फोसिस, पॉवर ग्रिड हे शेअर्स सर्वाधिक वाढले. तर भारती एअरटेल, एम अँड एम, एचडीएफसी बँक हे शेअर्स घसरले.

एनएसई निफ्टी ५० निर्देशांक आज २१,७२७ वर खुला झाला. त्यानंतर तो २१,८३४ पर्यंत गेला. निफ्टीवर नेस्ले इंडिया, अदानी एंटरप्रायझेस (Shares of Adani Enterprises), अदानी पोर्ट्स, टेक महिंद्रा, विप्रो हे टॉप गेनर्स शेअर्स होते. तर आयशर मोटर्स, भारती एअरटेल, एम अँड एम, बजाज ऑटो, हिंदाल्को हे शेअर्स घसरले.

अदानींचे शेअर्स तेजीत

आज अदानी समूहाच्या शेअर्समध्ये ४ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. निफ्टी ५० वर अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्स हे आघाडीवर होते. निफ्टीवर अदानी एंटरप्रायझेसचे शेअर २.२७ टक्क्यांनी वाढून २,९१३ रुपयांवर पोहोचला. तर अदानी पोर्ट्सचा शेअर २.२६ टक्क्यांनी वाढून १,०४७ रुपयांवर गेला. अदानी एनर्जी आणि अदानी टोटल गॅस हे प्रत्येकी १ टक्क्याने वाढले. अदानी विल्मर ४ टक्क्यांनी वाढला. एनडीटीव्ही, अंबुजा सिमेंट आणि एसीसी या शेअर्सनी आज हिरव्या चिन्हात व्यवहार केला. ३ जानेवारी रोजी नियोजित बोर्ड बैठकीपूर्वी अदानी पोर्ट्सचा शेअर्स वधारला.

व्होडाफोन आयडियाचे शेअर्सही वधारले

व्होडाफोन आयडियाचे शेअर्स सोमवारी एनएसईवर (NSE) वर १५ टक्क्यांनी वाढून १८.४० रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले. त्यानंतर दुपारच्या व्यवहारात हा शेअर्स १७.२५ रुपयांवर आला. मागील दोन सत्रांत हे शेअर्स ३७ टक्क्यांनी वाढले आहे. (Vodafone Idea Share Price)

परदेशी गुंतवणूकदारांचा खरेदीचा ओघ कायम

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) शुक्रवारी १,४५९ कोटी रुपयांचे भारतीय शेअर्स खरेदी केले. तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DIIs) ५५४ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.

अमेरिकेतील शेअर बाजारात गेल्या शुक्रवारी घसरण झाली होती. दरम्यान, नववर्षानिमित्त आज बहुतांश आशियाई बाजार बंद होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news