Stock Market T+0 Settlement | शेअर विकताच लगेच अकाउंटमध्ये जमा होणार पैसे, सेबीचा नवा प्रस्ताव | पुढारी

Stock Market T+0 Settlement | शेअर विकताच लगेच अकाउंटमध्ये जमा होणार पैसे, सेबीचा नवा प्रस्ताव

पुढारी ऑनलाईन : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने भारतीय शेअर बाजारात दोन टप्प्यांत पर्यायी आधारावर सेम-डे सेटलमेंट (T+0) आणि इन्स्टंट सेटलमेंट प्रणाली लागू करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. याचा गुंतवणूकदारांना फायदा होणार आहे. यामुळे शेअर विकल्यानंतर तुमच्या बँक अकाउंटमध्ये त्याच दिवशी पैसे येणार आहेत. त्यासाठी आता वाट पाहावी लागणार नाही. (Stock Market T+0 Settlement)

संबंधित बातम्या 

गुंतवणूकदारांना कसा होईल फायदा?

सेबीने सेम-डे-सेटलमेंट (T+0) आणि इन्स्टंट सेटलमेंटचा प्रस्ताव दिला आहे. यावर सेबीने सार्वजनिक सूचनादेखील मागविल्या आहेत. सध्याच्या T+1 चक्राव्यतिरिक्त ही छोटी सेटलमेंट सायकल असेल. हा नवा नियम आल्यानंतर गुंतवणूकदारांना अधिक फायदा होईल. जेव्हा ते शेअर खरेदी करतील तेव्हा त्याच दिवशी ते डिमॅट अकाउंटमध्ये ट्रान्सफर होतील. तसेच शेअर विकल्यानंतर त्याच दिवशी अथ‍वा तत्त्काळ अकाउंटमध्ये पैसे जमा होतील.

नेमकी T+0 प्रणाली आहे तरी कशी?

बाजार नियामक सेबीने जारी केलेल्या कन्सल्टेशन पेपरमध्ये म्हटले आहे की, जर T+0 आणि इन्स्टंट सेटलमेंट प्रणाली लागू केल्यास तरलतेची समस्या राहणार नाही. गुंतवणूकदारांकडे T+1 शिवाय T+0 आणि इन्स्टंट सेटलमेंटचा पर्याय असेल.

“… अशी कल्पना आहे की इक्विटी कॅश सेगमेंटसाठी विद्यमान T+1 सेटलमेंट सायकल व्यतिरिक्त एक लहान सेटलमेंट सायकल पर्याय म्हणून सादर केला जाऊ शकते,” असे सेबीने म्हटले आहे.

सेबीच्या कन्सल्टेशन पेपरनुसार, पहिल्या टप्प्यात पर्यायी T+0 सेटलमेंट सायकल (दुपारी १:३० वाजेपर्यंत) निधी आणि सिक्युरिटीजच्या सेटलमेंटसह त्याच दिवशी संध्याकाळी ४:३० वाजेपर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे.

दुसऱ्या टप्प्यात दुपारी ३.३० वाजेपर्यंत केलेल्या सर्व व्यवहारांसाठी पर्यायी तत्काळ ट्रेड- बाय-ट्रेड सेटलमेंट (निधी आणि सिक्युरिटीज) केले जाऊ शकते. म्हणजे दुपारी ३.३० वाजेपर्यंत केलेल्या सर्व व्यवहारांसाठी हा पर्याय असेल.

सेटलमेंट सायकल T+5 वरुन आता T+0

सेटलमेंट सायकल २००२ मध्ये T+5 वरून T+3 आणि त्यानंतर २००३ मध्ये T+2 पर्यंत आणण्यात आले. पुढे २०२१ मध्ये T+1 सेटलमेंट टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले. जे जानेवारी २०२३ पासून पूर्णपणे लागू करण्यात आले.

सेबीच्या कन्सल्टेशन पेपरनुसार, सुरुवातीला बाजार भांडवलावर आधारित टॉप ५०० सूचीबद्ध कंपन्यांमध्ये T+0 सेटलमेंट प्रणाली उपलब्ध करून दिली जाईल. हे २००, २००, १०० च्या तीन टप्प्यांत सर्वात कमी ते सर्वाधिक बाजार भांडवल असलेल्यांमध्ये केले जाईल. (Stock Market T+0 Settlement)

Back to top button