XPoSat Mission : नवीन वर्षात नवा अवकाश इतिहास रचण्यासाठी इस्रो सज्ज; धुव्रीय उपग्रह PSLV-C58 उद्या प्रक्षेपण

PSLV-C58/XPoSat Mission
PSLV-C58/XPoSat Mission

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) नवीन वर्षात 'कृष्णविवरांचा अभ्यास' (black holes) करण्यासाठी  XPoSat Mission साठी सज्ज झाले आहे. या अभ्यासासाठी PSLV-C58 रॉकेटच्या माध्यमातून 'एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह मिशन'चे साेमवार, १ जानेवारी राेजी प्रक्षेपण करण्यात येणार आहे, अशी माहिती  इस्रोने त्यांच्या अधिकृत 'X' अकाऊंटवरून दिली आहे.
(PSLV-C58/XPoSat Mission)

भारतीय अंतराळ संशोधन संस्था आपल्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवण्यास सज्ज आहे. भारत आपले पहिले 'एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह' हे ध्रुवीय मिशन सुरू करणार आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सोमवार, १ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९.१० वाजता PSLV-C58 चे प्रक्षेपण होईल. यामध्ये पीएसएलव्ही सी ५८ सह एक्स-रे पोलरीमेट्री सॅटेलाईट (एक्स्पो सॅट) पाठवले जाणार आहे. हा उपग्रह कृष्णविवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करेल. (PSLV-C58/XPoSat Mission)

PSLV-C58/XPoSat Mission: जगातील दुसरे ध्रुवीय मिशन

एक्स्पो सॅट ही आदित्य एल १ आणि  ॲस्ट्रो सेंटनंतर अंतराळात स्थापन होणारी तिसरी वेधशाळा असेल. २०२१ मध्ये लाँच केलेल्या 'नासा'च्या इमेजिंग एक्स-रे पोलरीमेट्री एक्सप्लोररनंतर हे भारताचे पहिले आणि जगातील दुसरे ध्रुवीय मिशन आहे, असे देखील 'इस्रो'ने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

तेजस्वी ताऱ्यांचा अभ्यास करणार

या मोहिमेचे उद्दिष्ट विश्वातील ५० तेजस्वी स्रोतांचा अभ्यास करणे असा आहे. यामध्ये पल्सर, ब्लॅक होल एक्स-रे बायनरी, सक्रिय गॅलेक्टिक न्यूक्ली, न्यूट्रॉन तारे आणि थर्मल नसलेल्या सुपरनोव्हाचे अवशेष समाविष्ट आहेत. हा उपग्रह ५००-७०० कि.मी.च्या कमी पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केला जाईल. तो ५ वर्षे विविध स्वरूपाची माहिती गोळा करेल. हा उपग्रह व त्याचा पेलोड यूआर राव उपग्रह आणि रमण संशोधन संस्थेने तयार केला आहे. याव्दारे अंतराळातील दूरच्या स्रोतांची भूमिती आणि यंत्रणा यांची माहिती जमा करणे शक्य होणार आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news