ISRO Review in Year 2023 : चांद्रयान ३, गगनयान, आदित्य एल १ – इस्रोची ऐतिहासिक कामगिरी

ISRO Review in  Year 2023
ISRO Review in Year 2023

पुढारी ऑनलाईन डेस्क : वर्ष २०२३ संपण्यासाठी काही दिवसांचा अवधी राहिलेला आहे. या वर्षाची नोंद भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी होण्याचं कारण आहे, ते इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने (इस्रो) चांद्रयान ३, गगनयान आणि आदित्य एल १ या तीन मोहिमांमुळे भारताचा झेंडा अवकाश संशोधनात दिमाखात डौलू लागला आहे. भारताच्या अवकाश संशोधनाच्या वाटचालीत २०२३ हे यामुळेच मैलाचा दगड ठरणारं आहे. (ISRO Review in Year 2023)

2023 Year in Review: चांद्रयान ३

भारताची चांद्रयान ३ ही मोहीम यशस्वी ठरली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोव्हरचे सॉफ्ट लँडिंग करण्यात इस्रोला यश आले. २३ ऑगस्ट २०२३ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिला देश ठरला. तर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत चौथा देश ठरला. यापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीन या तीन देशानांच सॉफ्ट लँडिंग यशस्वी करता आले होते. इस्रोने या मोहिमेतून देशाची तंत्रविषयक क्षमता जगाला दाखवून दिली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील हवामान कसे आहे, याचा सविस्तर अभ्यास या मोहिमेने केला शिवाय चंद्राच्या मातीत गंधक असल्याचाही शोध चांद्रयान ३ मुळे लागू शकला. लाखो भारतीयांनी हा क्षण लाईव्ह स्ट्रिमच्या माध्यमातून पाहिला, हाही एक उच्चांक ठरला. (ISRO Review in Year 2023)

चांद्रयान ३
चांद्रयान ३

आदित्य एल १

चांद्रयान ३ च्या यशानंतर भारताने आदित्य एल १ ही सूर्य मोहिम हाती घेतली. सूर्याचा सखोल अभ्यास करण्याचे काम ही मोहीम करणार आहे. सूर्याच्या बाह्यभागाचा अभ्यास करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. (ISRO Review in Year 2023)

आदित्य एल १
आदित्य एल १

गगनयान मोहिम हाती

याशिवाय अवकाशात अंतराळवीर पाठवण्याच्या दृष्टीने इस्रोची पावले पडत आहेत. गगनयान मोहिमेची चाचणीही झालेली आहे. याशिवाय भारत अमेरिकेच्या पुढाकाराने सुरू असलेल्या Artemis Accord मध्ये सहभागी झालेला आहे. त्यातून चांद्र मोहिमांतील माहिती संशोधनाच्या कामात दोन्ही देश वापरणार आहेत. भारताने २०३५पर्यंत स्पेस स्टेशनची उभारणी, २०४०ला चंद्रावर मनुष्य पाठवणे ही महत्त्वाकांक्षी उद्दिष्टं ठेवली आहेत, यासाठी शासकीय आणि खासगी संस्थांची मदत घेतली जाणार आहे.

गगनयान मोहिम
गगनयान मोहिम

खासगी संस्थांना अवकाश खुले

भारताने २०२३मध्ये अवकाश संशोधनाचे विश्व खासगी संस्थांसाठी खुले केले आहे, तसेच या क्षेत्रातील स्टार्टअपनाही मदत केली जाणार आहे. यातून अग्नीकूल कॉसमॉसने खासगी लाँच सुविधा सुरू केली आहे. भारताने मायक्रोसॉफ्टसोबत एक करारही केलेला आहे. याशिवाय रियुजेबल लाँच व्हेइकलचीही चाचणी घेण्यात आली असून अवकाश पर्यटनाचे द्वारही खुले होणार आहे.
विशेष बाब म्हणजे इतर देशांशी तुलना करता अत्यंत कमी खर्चात भारताने या मोहिमा यशस्वी केल्या आहेत. तसेच खर्च जरी कमी असला तर संशोधन म्हणून उपलब्धीत कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही. आगामी काळात इस्रो एक्स रे पोलॅरिमिटर सॅटेलाईट आणि गगनयानचे मानव स्पेसफ्लाईट याकडे जगाचे लक्ष असणार आहे. २०२३मध्ये इस्रोने एक बेंचमार्क प्रस्थापित केले आहे. विशेष म्हणजे या वर्षात इस्रोची एकही मोहीम अपयशी ठरेलली नाही.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news