Stock Market Updates | शेअर बाजाराची कमजोर सुरुवात; IT, बँकिंगमधील विक्रीमुळे दबाव | पुढारी

Stock Market Updates | शेअर बाजाराची कमजोर सुरुवात; IT, बँकिंगमधील विक्रीमुळे दबाव

पुढारी ऑनलाईन : संमिश्र जागतिक संकेतांदरम्यान २०२३ च्या शेवटच्‍या ट्रेडिंग दिवशी भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक लाल चिन्हात खुले झाले. विशेषतः हेवीवेट इन्फोसिस, एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील विक्रीमुळेही बाजारावर दबाव दिसून आला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २५० अंकांनी खाली येऊन ७२,२०० च्या खाली आला होता. तर निफ्टी ४३ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २१,७३४ वर व्यवहार करत होता. (Stock Market Updates)

संबंधित बातम्या 

सेन्सेक्सवर एनटीपीसी, पॉवर ग्रिड, एसबीआय, टायटन, कोटक बँक हे शेअर्स सुमारे १ टक्क्यांनी खाली आले आहेत. तर टाटा मोटर्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, विप्रो, एशियन पेंट्स हे शेअर्स वाढले होते.

sensex opening

एनएसई निफ्टी आज २१,७३७ वर खुला झाला. निफ्टीवर बीपीसीएल, एनटीपीसी, पॉवर ग्रिड, कोल इंडिया, एसबीआय हे शेअर्स लाल चिन्हात व्यवहार करत आहेत. तर टाटा कंझ्युमर, टाटा मोटर्स, अदानी पोर्ट्स हे शेअर्स वाढले आहेत. निफ्टी बँक, निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेसवर विक्रीचा दबाव दिसून येत आहे. (Stock Market Updates)

टाटा कॉफीचे शेअर्स ४ टक्क्यांनी वाढले आहेत. कारण ही कंपनी टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स (TCPL) आणि TCPL बेव्हरेजेस अँड फूड्स (TBFL) मध्ये १ जानेवारीला विलीन होईल.

Back to top button