मोबाईल चोरल्यानंतर चोर म्हणाला- दीदी...सुनो फोन नहीं मिलेगा, तुम्हें नया ही खरीदना पड़ेगा | पुढारी

मोबाईल चोरल्यानंतर चोर म्हणाला- दीदी...सुनो फोन नहीं मिलेगा, तुम्हें नया ही खरीदना पड़ेगा

आग्रा :  येथील चोरांनी एका तरुणाचा मोबाईल हिसकावला. यानंतर तरुणाच्या बहिणीने फोन केला असता चोर म्हणाला की, दीदी तुम्हाला नवीन फोन घ्यावा लागेल. पैशाबद्दल बोलू नका. जर तुम्ही पासवर्ड सांगितलात तर मी व्हॉट्सअॅपवर फोटो आणि इतर कागदपत्रे शेअर करेन. शुक्रवारी चोराशी झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली.

अवधूत गुप्ते म्हणाले, तिरस्काराचे चटके तुम्हालाही बसतील; काळजी घ्या

एत्माद्दौला पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शाहदरा येथील श्रीनगर कॉलनीत राहणारा सूरज एका कारखान्यात काम करतो. गुरुवारी सायंकाळी तो सायकलवरून घरी परतत होता. सर्व्हिस रोडवरवरून येत असताना अचानक दुचाकीवर आलेल्या तरुणांनी त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. शुक्रवारी सकाळी घरच्यांनी त्याच्या मोबाईलवर फोन केला. बेल वाजली पण, कोणीही फोन उचलला नाही.

Sangli Jilha Bank : सांगली जिल्ह्यातील मतपत्रिका एकत्र करूनच मतमोजणी होणार

काही वेळानंतर सुरजच्या बहिणीने तिच्या नंबरवरून फोन केला. मात्र यावेळेस चोराने फोन उचलला. सूरजच्या बहिणीने सांगितले की, भाऊ रडत आहे. अन्नही खात नाही. पैसे घ्या आणि मोबाईल परत करा. चोराने मोबाईल देण्यास नकार दिला. मुलीने त्याच्याकडे विनवणी केली, पण चोर राजी झाला नाही. उलट तो म्हणाला की त्याच्या मित्राला हा फोन हवा आहे. शेवटी चोरानी सांगितले की,जर तुम्ही पासवर्ड सांगितलात तर मी व्हॉट्सअॅपवर फोटो आणि इतर कागदपत्रे शेअर करेन. दुसरीकडे, पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल करून घेतली आहे. एत्माद्दौला पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक देवेंद्र शंकर पांडे सांगितले की तक्रार प्राप्त झाली आहे. लवकरच गुन्हा दाखल करून तपास केला जाईल.

हेही वाचा:

Awade and Mahadik : विधानपरिषद निवडणूक प्रचारादरम्यान प्रकाश आवाडे आणि महादेवराव महाडिक यांच्यातील व्हिडिओने खळबळ

पुणे : फेसबुक लाईव्ह करत वेटरची आत्‍महत्‍या; हॉटेलच्या तेराव्या मजल्‍यावरून मारली उडी

 

Back to top button