पुणे : फेसबुक लाईव्ह करत वेटरची आत्‍महत्‍या; हॉटेलच्या तेराव्या मजल्‍यावरून मारली उडी | पुढारी

पुणे : फेसबुक लाईव्ह करत वेटरची आत्‍महत्‍या; हॉटेलच्या तेराव्या मजल्‍यावरून मारली उडी

पुणे ; पुढारी वृत्तसेवा

मुंढवा परिसरातील पेंट हाऊझ या प्रसिद्ध हॉटेलच्या तेराव्या मजल्यावरून कामगाराने (वेटर) उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापुर्वी संबंधीत कामगाराने फेसबुक लाईव्ह करत आपण आत्महत्या करणार असल्याचे म्हटले. हॉटेलमधील काही लोकांनी त्याला फसवले असून, काही कामे त्याच्याकडून करुन घेतली असल्याचे त्याने व्हिडीओमध्ये म्हटले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवार (दि.17) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अरविंद सिंह राठौर (वय 26, रा. सनेती, उत्तराखंड) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी, मुंढवा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अरविंद एक महिन्यापुर्वी हॉटेलमध्ये कामासाठी आला होता.

Priyanka Gandhi Letter : लखीमपूर हिंसा प्रकरणी PM मोदींना पत्र, केलं ‘हे’ आवाहन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद हा मूळचा उत्तराखंडचा रहिवासी आहे. मुंढवा परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये तो एक महिन्यापुर्वीच कामाला आला होता. बुधवारी रात्री तो हॉटेलच्या टेरेसवर (तेराव्या मजल्यावर) उभा होता. त्यावेळी त्याने फेसबुक लाईव्ह करत तो आत्महत्या करणार असल्याचे म्हटले. यावेळी त्याने हॉटेलमधील काही लोकांवर आरोप करत त्यांनी आपले वाईट केले असून, फसवून काही कामे करून घेतल्याचे म्हटले. त्यानंतर तो इमारतीच्या भिंतीवर उभा राहिला. तेथील लोकांनी त्याला खूप थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने काही क्षणातच खाली उडी मारली.

घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, पोलिस उपनिरीक्षक भोसले व त्यांच्या साथीदारांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी अरविंद रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला होता. उपचारासाठी त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अरविंद याने आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून केली याबाबत तपास सुरू असल्याची माहिती नाईकवाडी यांनी दिली.

Back to top button