पूंछमध्‍ये घडलेल्‍या घटनेची पुनरावृत्ती टाळा, नागरिकांची मने जिंका : संरक्षण मंत्र्यांचे लष्‍कराला आवाहन | पुढारी

पूंछमध्‍ये घडलेल्‍या घटनेची पुनरावृत्ती टाळा, नागरिकांची मने जिंका : संरक्षण मंत्र्यांचे लष्‍कराला आवाहन

पुढारी ऑनलाईन डस्‍क : भारतीय लष्‍करावर केवळ देशाला शत्रूंपासून बचाव करण्‍याची जबाबदारी नाही तर नागरिकांची मने जिंकण्याचीही जबाबदारी आहे. त्‍यामुळे पूंछमध्‍ये घडलेल्‍या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन आज (दि. २७) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. जम्‍मू-काश्‍मीरमधील राजौरी येथे जवानांशी संवाद साधताना बोलत होते.

जम्मू-काश्मीरमध्ये पुंछमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राजनाथ सिंह आज जम्‍मू-काश्‍मीर दौर्‍यावर आहेत. राजौरी येथे बोलताना ते म्‍हणाले की, “आम्ही युद्धे जिंकू आणि दहशतवादाचा नायनाटही करू. सर्व नागरिकांची मने जिंकण्याची आम्ही खात्री करा. तुमच्या सर्वांच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी आहे.”

भारतीय लष्‍कराला केवळ लष्कराला केवळ देशाला शत्रूंपासून वाचवायचे नाही, तर लोकांची मने जिंकण्याचीही जबाबदारी आहे, असे स्‍पष्‍ट करत पुंछमध्‍ये दहतवादी हल्‍ल्‍यानंतर झालेली घटना पुन्हा होणार नाहीत याची खात्री करा. जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद संपला पाहिजे. दहशतवादाचा नायनाट करण्‍याच्‍या वचनबद्धतेसह पुढे वाटचाल करा, असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.

पूंछमध्‍ये आढळले होते तीन नागरिकांचे मृतदेह

काश्‍मीरमधील पूंछ येथे 22 डिसेंबर रोजी दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान 27 ते 42 वयोगटातील तीन नागरिक मृतावस्थेत आढळले होते. दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांना सैन्याच्‍या अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्‍यात घेतले होते, असा आरोप स्‍थानिक नागरिकांनी केला होता.

हेही वाचा: 

 

 

Back to top button