१५ हजार ९२० कोटी रुपयांची मिलिट्री हार्डवेअरची विक्रमी निर्यात : संरक्षण मंत्री राजनाथ सिंग | पुढारी

१५ हजार ९२० कोटी रुपयांची मिलिट्री हार्डवेअरची विक्रमी निर्यात : संरक्षण मंत्री राजनाथ सिंग

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये विक्रमी 15 हजार 920 कोटी रुपयांची मिलिट्री हार्डवेअरची निर्यात झाली असल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी शनिवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. वर्ष 2021-22 मध्ये हीच निर्यात 12 हजार 814 कोटी रुपयांची होती.

मिलिट्री हार्डवेअरच्या निर्यातीत सातत्यपूर्ण वाढ होत असून वर्ष 2022-23 मध्ये निर्यातीचा विक्रमी आकडा गाठला गेला आहे, असे सिंग यांन नमूद केले. याआधी वर्ष 2016-17 मध्ये 1 हजार 521 कोटी रुपये, 2017-18 मध्ये 4 हजार 682 कोटी रुपये, वर्ष 2018-19 मध्ये 10 हजार 745 कोटी रुपये, 2019-20 मध्ये 9 हजार 115 कोटी रुपये तर वर्ष 2020-21 मध्ये 8 हजार 434 कोटी रुपयांच्या मिलिट्री हार्डवेअरची निर्यात झाली होती, असेही सिंग यांनी सांगितले.

हेही वाचा : 

 

Back to top button