Kerala Bridge Collapse : केरळमध्ये ख्रिसमसच्या उत्सवादरम्यान पूल कोसळला, अनेक जखमी | पुढारी

Kerala Bridge Collapse : केरळमध्ये ख्रिसमसच्या उत्सवादरम्यान पूल कोसळला, अनेक जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : केरळची राजधानी तिरुवनंतपुरममध्ये सोमवारी रात्री ख्रिसमसच्या उत्सवादरम्यान एक तात्पुरता पूल कोसळला. रात्री नऊच्या सुमारास अनेक लोक एकाच वेळी पुलावर चढले. जास्त भारामुळे पूल एका बाजूला झुकला, त्यामुळे त्यावर उभे असलेले लोक खाली पडले. यामध्ये ७ ते ८ जण जखमी झाले आहेत. (Kerala Bridge Collapse)

हा पूल नाताळच्या सेलिब्रेशनसाठी बांधण्यात आला होता. धबधबा आणि येशूचा जन्म तसेच इतर देखावे पाहण्यासाठी ही भिंत ओलांडून पलीकडे जाण्यासाठी तात्पुरता पुल उभारण्यात आला होता. पुलाची उंची सुमारे पाच फूट होती. एका वेळी मोजक्याच लोकांना भेट देता येत होती. मात्र अनेक जण एकत्र पुलावर चढले, त्यामुळे हा अपघात घडला. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Kerala Bridge Collapse)

हेही वाचा : 

Back to top button