राहुल गांधींनी हिंदू आणि हिंदी भाषिकांविरोधात नसल्‍याचे सिद्ध करावे : ‘बीआरएस’ नेत्‍या के कवितांचे आव्‍हान | पुढारी

राहुल गांधींनी हिंदू आणि हिंदी भाषिकांविरोधात नसल्‍याचे सिद्ध करावे : 'बीआरएस' नेत्‍या के कवितांचे आव्‍हान

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंडिया आघाडीच्‍या बैठकीत द्रमुक पक्षाच्‍या नेत्‍याला बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमारांनी हिंदी भाषेवरुन सुनावले हाेते. यानंतर द्रमुकचे खासदार दयानिधी मारन यांनी हिंदी भाषिकांवर वादग्रस्‍त टिप्‍पणी केली. आता या वादात भारत राष्‍ट्र समिती पक्षाच्‍या नेत्‍या ( BRS leader ) के. कविता (K Kavitha ) यांनी उडी घेत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांना आव्‍हान दिले आहे.

‘पीटीआय’शी बोलताना के. कविता म्‍हणाल्‍या की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा भारत जोडा यात्रा हा स्‍टंट केवळ लोकप्रियतेसाठी होता. हिंदी भाषिकांबाबत वादग्रस्‍त विधान करणारे इंडिया आघाडीतील द्रमुकचे नेते दयानिधी मारन यांच्‍या विधानावर आणि सनातन धर्माबाबत राहुल गांधींनी मौन बाळगले आहे. मारन यांचे विधान हे एका विशिष्ट पक्षाच्या मतांबद्दल नाही, तर अशा प्रकारची विधाने आपल्या देशाच्या जडणघडणीला धक्‍का देणारी आहेत.  हा विशिष्ट पक्ष कोणत्या आघाडीचा भाग आहे, असा सवालही त्‍यांनी केला.

कविता यांनी म्‍हटले आहे की, “काही नेते मतांसाठी अशी वादग्रस्‍त विधाने करत आहेत. याचा शेवट हा आपण कल्पना करू शकत नाही अशा मार्गांनी होईल. राहुल गांधी यांनी सनातन धर्म वादावर प्रतिक्रिया दिली असतीतर अशी विधाने इतरांनी केली नसती. अशा प्रकारच्‍या विधानांकडे दुर्लक्ष करु नये.”

हेही वाचा :

Back to top button