Sanjay Raut | ‘इंडिया’ आघाडीला हरवणे सोपे नाही तर ‘अशक्य’- संजय राऊत | पुढारी

Sanjay Raut | 'इंडिया' आघाडीला हरवणे सोपे नाही तर 'अशक्य'- संजय राऊत

पुढारी ऑनलाईन : इंडिया अघाडीची आज मुंबईतील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये बैठक होत आहे. यामध्ये देशभरातून २५ विरोधी पक्ष सहभागी होत आहेत. सत्ताधारी पक्षाकडून या बैठकीवर जोरदार टीका करण्यात येत आहे. बैठकीपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे  खासदार संजय राऊत यांनी ‘इंडिया’ आघाडीला हरवणे सोपे नाही तर ‘अशक्य’ आहे, असे मत माध्यमांशी बोलताना केले. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीची भूमिका (Sanjay Raut) स्पष्ट केली.

पुढे सत्ताधारी पक्षांच्या बॅनरबाजीवर बोलताना राऊत म्हणाले, ते इंडिया आघाडीवर जळतात. पण ‘इंडिया’ आघाडी कोणतेही मतभेद असल्यास एकत्र बसून सोडवते. त्यामुळे इंडिया अलाएन्सला हरवणे सोपे नाही तर ‘अशक्य’ आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. शिवसेनेने आपल्या भूमिकेपासून कधीही माघार घेतलेली नाही. शिवसेना ही तिच्या विचारांवर ठाम आहे. ‘जशी विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी पुढे जाईल, आपली शक्ती पाहून चीन सीमेवरून मागे हटण्यास सुरुवात करतील’, असेही राऊत यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

काँग्रेसच्या राहुल गांधी यांच्यावर देशातील लोक प्रेम करतात. त्यांच्यावर देशातील लोकांवर विश्वास आहे. त्यांचे नेतृत्त्व देशातील लोकांनी स्वीकारले आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. आजपासून सलग दोन दिवस ‘इंडिया’ आघाडीची बैठक मुंबईतील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये आज दुपारी (दि.३१) ४ वाजता होत आहे. या बैठकीत इंडिया आघाडीच्या लोगोचे देखील अनावरण करण्यात येणार आहे. या बैठकीसाठी देशभरातील विरोधी पक्षांचे नेते मुंबईत दाखल होत (Sanjay Raut) आहेत.

हेही वाचा:

 

Back to top button