भाजपचे विधानपरिषदेचे उमेदवार जाहीर | पुढारी

भाजपचे विधानपरिषदेचे उमेदवार जाहीर

“मुंबई : पुढारी वृत्तसेवा” image=”http://”][/author]

भाजपने विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी चार उमेदवार जाहीर केले आहेत.
कोल्हापूर मधून राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात अपेक्षेप्रमाणे माजी आमदार अमल महाडिक यांना रिंगणात उतरविण्यात आले आहे. कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा गृहराज्यमंत्री सतेज पाटील विरुद्ध अमल महाडिक असा सामना रंगणार आहे. अमल महाडिक यांच्या उमेदवाराने ही लढत रंगतदार ठरणार आहे.

धुळे – नंदुरबार मतदारसंघातून विद्यमान आमदार व माजी मंत्री अमरीश पटेल यांना उमेदवारी मिळाली आहे. गेल्या निवडणुकीत त्यांनी एकतर्फी लढत जिंकली होती. अकोला वाशिममध्ये खंडेलवाल यांची महाविकास आघाडीच्या उमेदवाराची चुरशीची लढत रंगणार आहे.
तर अकोला वाशिम मधून वसंत खंडेलवाल यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूरमधून गिरीश व्यास यांचा पत्ता कट करून उमेदवारी दिली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानसभेचे तिकीट नाकारण्यात आले होते. बावनकुळे यांनी आपल्या पत्नीला उमेदवारी मिळावी म्हणून देखील अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले होते. मात्र भाजपने त्यांनाही उमेदवारी दिली नाही. बावनकुळे यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने विदर्भात काही मतदारसंघात प्रभावी असलेली तेली समाजाची मते दुरावली. आता बावनकुळे यांना उमेदवारी देऊन भाजपने त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

Back to top button