Land for job scam | बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना ‘ईडी’कडून पुन्हा समन्स | पुढारी

Land for job scam | बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना 'ईडी'कडून पुन्हा समन्स

पुढारी ऑनलाईन डेस्क: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शनिवारी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना नव्याने समन्स पाठवले आहे. रेल्वेत नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळाप्रकरणी त्यांना हे समन्स देण्यात आले आहे. यानानुसार, ईडीने त्यांना गुरूवारी ५ जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी त्यांना २२ डिसेंबर रोजी हजर राहण्यास सांगितले होते, परंतु तेजस्वी यादव चौकशीसाठी आले नाहीत. त्यांचे वडील लालू यादव यांनाही अंमलबजावणी संचालनालयाने २७ डिसेंबरला समन्स बजावले आहे. (Land for job scam)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शनिवारी(दि.२३) ईडीने नोकरीसाठी जमीन प्रकरणी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना नवीन समन्स जारी केले. सन २००४ ते २००९ दरम्यान रेल्वेत जमिनी घेऊन अनेकांना नोकऱ्या दिल्याप्रकरणी तपास यंत्रणा उपमुख्यमंत्र्यांची चौकशी करत आहे. या प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू यादव माजी मुख्यमंत्री राबडी देवी, तेजस्वी यादव, लालू यादव यांची मुलगी मीसा भारती यांच्यासह अनेक कुटुंबीय संशयित आरोपी आहेत. या प्रकरणी झाशी तपास यंत्रणेने अनेकवेळा चौकशी केली आहे. दरम्यान सध्या सीबीआय आणि ईडी या प्रसिद्ध घोटाळ्याची चौकशी करत आहे. (Land for job scam)

Land for job scam: ऑक्टोबरमध्ये जामीन मंजूर

या घोटाळा प्रकरणात ऑक्टोबरमध्ये बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालू यादव, बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि आरजेडीच्या खासदार मीसा भारती यांना दिलासा मिळाला होता. दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने कथित जमीन-नोकरी घोटाळ्याप्रकरणी चौघांनाही ऑक्टोबर २०२३ मध्ये जामीन मंजूर केला होता. (Land for job scam)

हेही वाचा:

 

Back to top button