Land For Job Scam : 'लॅंड फाॅर जाॅब' घोटाळा प्रकरणाची सुनावणी मे महिन्यापर्यंत पुढे ढकलली | पुढारी

Land For Job Scam : 'लॅंड फाॅर जाॅब' घोटाळा प्रकरणाची सुनावणी मे महिन्यापर्यंत पुढे ढकलली

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली : रेल्वेच्या विविध विभागात नोकरी देण्याच्या बदल्यात जमिनी घेण्याच्या [लँड फॉर जॉब] घोटाळा प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने दोषारोपपत्रांच्या प्रती लालूप्रसाद यादव यांच्यासह इतर आरोपीना देण्यास सांगितले आहे. दरम्यान या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ मे पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. (Land For Job Scam)

लॅंड फाॅर जाॅब घोटाळाप्रकरणी लालू यादव यांच्यासह बहुतांश आरोपींना याआधीच जामीन मिळालेला आहे. विशेष न्यायालयात बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी व त्यांच्या कन्या मिसा भारती हे स्वतः उपस्थित होते. लालूप्रसाद यादव हे वर्ष २००४ ते २००९ या कालावधीत रेल्वे मंत्री असताना लॅंड फाॅर जाॅब घोटाळा झाला होता. सदर प्रकरणात एकूण १६ आरोपी आहेत. आजच्या सुनावणीदरम्यान स्वतः लालू यादव हजर राहतील, असे मानले जात होते. पण ते हजर झाले नाहीत. पुढील काही दिवसांत याप्रकरणी सीबीआयकडून अतिरिक्त आरोपपत्र दाखल केले जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा 

Back to top button