Ayodhya Ram Temple : राम मंदिराच्या उभारणीसाठी चंद्रपूरच्या जंगलातील सागवान लाकूड | पुढारी

Ayodhya Ram Temple : राम मंदिराच्या उभारणीसाठी चंद्रपूरच्या जंगलातील सागवान लाकूड

पुढारी ऑनलाईन डेस्क : अयोध्येतील राम मंदिराच काम पुर्ण होण्याच्या टप्प्यावर आहे. येत्या काही दिवसात ते भाविकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. या राम मंदिराच्या उभारण्यासाठी महाराष्ट्रातील चंद्रपूरच्या जंगलातील सागवान लाकडाचा वापर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे सहाय्यक व्यवस्थापक जी.ए.मोटकर यांनी याबबत माध्यमांना माहिती दिली कीस, सुमारे १८५५ धनपूट सागवानाचे लाकून दिले जाईल. हा करार तब्बल १.३२ कोटी रुपयांचा आहे. (Ayodhya Ram Temple)

महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे सहाय्यक व्यवस्थापक जी.ए.मोटकर यांनी सांगितले की, डेहराडून फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटने राम मंदिर ट्रस्टला शिफारस केली होती की, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये उत्तम दर्जाचे लाकूड मिळू शकेल. हे लाकूड अतिशय दर्जेदार आहे. सेंट्रल व्हिस्टाच्या बांधकामातही या लाकडांचा वापर करण्यात आला आहे.

हेही वाचा 

Back to top button