Parliament Winter Session: खासदार निलंबनावरून संसदेत पुन्हा गोंधळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब | पुढारी

Parliament Winter Session: खासदार निलंबनावरून संसदेत पुन्हा गोंधळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब

पुढारी ऑनलाईन डेस्क: संसद सभागृह आणि परिसरातील तरूणांच्या घुसखोरीमुळे संसदेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेचे पडसाद काल (दि.१४) अधिवेशनात पाहायला मिळाले. संसद सुरक्षेवरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ घातला. यावरून काल (दि.१४) दुपारच्या सत्रात लोकसभेतील १३ आणि राज्यसभेतील १ खासदारांना निलंबित करण्यात आले. याचे पडसाद आज (दि.१५) देखील संसदेच्या दोन्ही सभागृहात दिसून आले. खासदारांच्या निलंबनावरून दोन्ही सभागृहातील पुन्हा गोंधळ पाहायला मिळाला. यावरून आज दुपारी २ वाजेपर्यंत पुन्हा संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. (Parliament Winter Session)

बुधवारी (दि.१३) संसदेत दोन तरूणांनी घुसखोरी केली. याप्रमाणेच काही तरूणांनी संसद परिसरात धुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेमुळे संसद सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. याचे पडसाद काल संसदेच्या दोन्ही सभागृहात पडले. संसदेच्या सुरक्षेवर गृहमंत्र्यांनी निवेदन द्यावे या मागणीवर विरोधक काल (दि.१४) दोन्ही सभागृहात आक्रमक झाले. परंतु आक्रमक झालेल्या विरोधी पक्षाच्या खासदारांना लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ घातला. दरम्यान १४ खासदारांवर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले. याचे पडसाद आज हिवाळी अधिवेशनाच्या १२ व्या दिवशी देखील पाहायला मिळाले. (Parliament Winter Session)

संसद घुसखोरी गदारोळ प्रकरण; संसद सभागृहांतील १४ खासदारांचे निलंबन

बुधवारी (दि.१३) संसदेत लोकसभा सभागृह सुरू असतानाच दोन तरूणांनी  घुसखोरी केली. दरम्यान संसद आणि परिसरात या तरूणांनी धुरांच्या नळकांड्या देखील फोडल्या. या घटनेचे पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले. यावरून विरोधकांनी लोकसभा आणि राज्यसभेत घोषणाबाजी करत गदारोळ घातला. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहातील काँग्रेसचे ९, डीएमकेचे २, सीपीआयचे २ आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रत्येकी एका खासदाराचे निलंबन करण्यात आले आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील उर्वरित सत्रासाठी हे खासदार निलंबित असणार आहेत.

निलंबित खासदारांची निदर्शने

संसद सभागृहातील निलंबित खासदारांनी दिल्लीतील संसद संकुलातील गांधी पुतळ्यासमोर निदर्शने केली. एकूण १५ खासदारांपैकी १४ लोकसभेचे आणि एक राज्यसभेचे आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी काल सर्वांना निलंबित करण्यात आले. दरम्यान काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संसदेत मकर द्वार येथे आंदोलन करणाऱ्या निलंबित खासदारांची भेट घेतली.

हेही वाचा:

Back to top button