Terrorist Attack in Pak : पाकिस्तानात पोलिस चौकीवर पुन्हा दहशतवादी हल्ला; ५ ठार

Terrorist Attack in Pak
Terrorist Attack in Pak
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानातील पोलिस आणि लष्कराच्या चौकीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये ५ जण ठार झाले. यामध्ये २ पोलिस आणि ३ हल्लेखोरांचा समावेश आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात ही घटना घडली. तीन दिवसांपूर्वी पाकिस्तानात आत्मघातकी स्फोटात २४ सैनिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ही दुर्घटना आज (दि.१५) घडली. या संदर्भातील वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे. (Terrorist Attack in Pak)

पोलिस प्रमुख इफ्तिखार शाह यांनी सांगितले की, शुक्रवारी पोलिस मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात दोन पोलिस अधिकारी ठार झाले आणि इतर तीन जण जखमी झाले. तर दोन हल्लेखोरांना आपला जीव गमवावा लागला. तसेच एपीच्या वृत्तानुसार, शेजारील लष्करी चौकीवर हल्ल्यादरम्यान तिसरा अतिरेकीही सैनिकांनी ठार केल्याचे शाह यांनी नमूद केले.

यापूर्वीच्या आत्मघातकी स्फोटात २४ सैनिक ठार

पाकिस्तानात पुन्हा एकदा मंगळवारी (दि.१२) दहशतवादी हल्ला करण्यात आला असून, यात 24 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोरांनी स्फोटकांनी भरलेल्या ट्रकने पोलिस स्टेशनला धडक दिली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. दहशतवाद्यांनी उत्तर-पश्चिम पाकिस्तानातील एका पोलिस स्टेशनला स्फोटकांनी भरलेल्या ट्रकने धडक मारली. धडकेनंतर स्फोटकांचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, यात 24 सैनिकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले. हा हल्ला पाकिस्तानातल्या खैबर पख्तूनख्वामधल्या अफगाणिस्तान सीमेजवळच्या डेरा इस्माईल खान भागात झाला, असे सांगण्यात आले.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news