Diya Kumari : राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी आहेत श्री रामाच्या वंशज; जाणून घ्या त्यांच्याबद्दल सविस्तर | पुढारी

Diya Kumari : राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी आहेत श्री रामाच्या वंशज; जाणून घ्या त्यांच्याबद्दल सविस्तर

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थानमध्ये भाजपने बंपर विजय मिळवल्यानंतर आज नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घोषीत केले. यामध्ये प्रेमचंद बैरवा आणि दिया कुमारी हे उपमुख्यमंत्री बनले आहेत. भाजपने आज घोषित केलेले तीनही नेते सध्या ट्रेंडिंगवर आहेत. पण यातील दिव्या कुमारी यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. दिव्या कुमारी यांनी काही दिवसांपूर्वी रामाचे वंशज असल्याची माहिती दिली होती. आज उपमुख्यमंत्री बनल्यानंतरही त्यांने प्रभु श्री राम की जय असा नाराही दिला.

उपमुख्यमंत्री दिया कुमारी या जयपूर संस्थानातील शेवटचे शासक महाराज मानसिंग द्वितीय आणि गायत्री देवी यांच्या नात आहेत. भाजपने दिया कुमारी यांना उपमुख्यमंत्री पद नाव घोषित केल्यानंतर स्थानिकांनी जल्लोष केला.  वसुंधरा राजे यांनीच दिया यांना राजकारणात आणल्याची माहिती राजस्थानमधील स्थानिक वृत्तपत्रांनी दिली आहे. २०१३ मध्ये जयपूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान दिया कुमारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावेळी पंतप्रधान मोदींसोबत वसुंधरा राजेही मंचावर उपस्थित होत्या.

भगवान श्रीराम यांचा मुलगा कुश यांचे आम्ही वंशज

दिया कुमारी यांनी भगवान श्रीराम यांचा मुलगा कुश यांचे वंशज असल्याची माहिती २०१९ मध्ये दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने “रघुवंश” मधील अयोध्येत राहत असणाऱ्यांविषयी जाणून घेण्यासाठी सुरु केलेल्या मोहिमेनंतर कुमारी यांनी हा दावा केलेला होता. ही माहिती देत असताना त्यांनी ‘आम्ही रामाचे वंशज आहोत. ”आमच्या हस्तलिखितांमध्ये, वंशावळीत आणि कागदपत्रांमध्ये याबाबतचा संदर्भ दिलेला आहे,” असे दिया कुमारी सांगितले होते.

ताजमहाल हा आमचाच महाल

दियाने ताजमहालला आपला महाल असे वर्णन देखील केले होते. ताजमहाल हा पूर्वी आपल्या कुटुंबाचा राजवाडा होता, जो मुघलांनी हिसकावून घेतला होता, असा दावा त्यांनी यापूर्वी केला होता. ताजमहालची सर्व कागदपत्रे आपल्याकडे असल्याचेही दिया कुमारी यांनी सांगितले आहे.

हेही वाचा

Back to top button