Rajasthan New CM : राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यावर ३५ लाखांचे कर्ज

Rajasthan New CM : राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यावर ३५ लाखांचे कर्ज
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशापाठोपाठ राजस्थानमध्ये सुद्धा धक्कातंत्राचा अवलंब करत भाजरने अखेर भजनलाल शर्मा यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली. आज (दि.१२) झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत भजनलाल शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. भजनलाल शर्मा यांची एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावर ३५ लाखांचे कर्ज देखील आहे. Rajasthan New CM

पहिल्यांदाच सांगानेर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी झालेले भजनलाल शर्मा करोडपती आहेत. त्यांची एकूण मालमत्ता 1, 46,56,666 रुपये आहे. तर त्यांच्य़ावर 35 लाख रुपये कर्ज आहे. विधानसभा निवडणुकीत दिलेल्या संपत्तीच्या तपशिलाशी संबंधित प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या एकूण संपत्तीपैकी 1,15,000 रुपये रोख आहेत, तर त्यांच्याकडे सुमारे 11 लाख रुपयांच्या ठेवी आहेत. विविध बँकांमध्ये खाती आहेत. Rajasthan New CM

शर्मा यांच्याकडे तीन तोळे सोने आहे, ज्याची किंमत 1,80,000 रुपये आहे. त्यांनी शेअर्स किंवा बाँड्समध्ये कोणतीही गुंतवणूक केलेली नाही. परंतु त्यांच्याकडे एलआयसी आणि एचडीएफसी लाईफच्या दोन विमा पॉलिसी आहेत. ज्यांची किंमत 2,83,817 रुपये आहे. याशिवाय त्यांच्या नावावर टाटा सफारी गाडी आहे. ज्याची किंमत ५ लाख रुपये आहे. याशिवाय एक टीव्हीएस व्हिक्टर मोटरसायकल असून त्याची किंमत 35,000 रुपये आहे, असे त्यांनी आपल्या निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

त्यांच्याकडे राजस्थानच्या भरतपूरमध्ये 0.035 हेक्टर शेतजमीन आहे, ज्याची किंमत 3 लाख रुपये इतकी आहे. भरतपूरमध्येही मुख्यमंत्र्यांच्या नावावर दोन घर आणि एक फ्लॅट आहे. प्रतिज्ञापत्रात त्यांची किंमत सुमारे एक कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या नावावर कोणतीही व्यावसायिक इमारत किंवा बिगरशेती जमीन नाही.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news