Alpha Male and Female : ‘अल्‍फा’ पुरुषापेक्षा ‘अल्‍फा’ महिला असतात ताकदवान, जाणून घ्‍या संशोधन काय सांगते? | पुढारी

Alpha Male and Female : 'अल्‍फा' पुरुषापेक्षा 'अल्‍फा' महिला असतात ताकदवान, जाणून घ्‍या संशोधन काय सांगते?

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट रिलीज झाल्यानंतर ‘अल्‍फा’ पुरुष चर्चेत आहेत. या चित्रपटात ‘अल्फा पुरूष’ हा एकच शब्द अनेक वेळा बोलला गेला आहे. अभिनेता रणबीर कपूर स्वतःला अल्फा पुरूष म्हणतो. ‘अल्फा’ ही अशी व्यक्ती असते जी प्रत्येक परिस्थितीवर नियंत्रण ठेवते आणि खूप वर्चस्व देखील गाजवते. पुरुषांच्या इतरही अनेक श्रेणी आहेत; परंतु जगात केवळ अल्फा पुरुषच नाहीत तर या श्रेणीतील महिला देखील आहेत. ‘अल्‍फा’ पुरुषापेक्षा ‘अल्‍फा’ महिला ताकदवान असतात. जाणून घेऊया संशोधन काय सांगते? (Alpha Male and Female)

संबंंधित बातम्या : 

अल्फा महिला कशा असतात?

या महिला तेजस्वी, प्रतिभावान असतात. अनेकदा अशा महिलांना एकटीला प्रवास करायला आवडते आणि बहुतेक वेळा त्यांचे मन पूर्णपणे नियंत्रणात असते. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे भावनिक बुद्धिमत्ताही चांगली असते. वेगवेगळ्या गटात सामील झाल्यानंतरही त्या त्यांच्यात एक वेगळी ओळख निर्माण करतात. (Alpha Male and Female)

चिंपांझींवर केला होता अभ्यास

अल्फा महिलांसाठी थेट स्त्रियांवर कोणताही अभ्यास केला गेला नाही. शास्त्रज्ञांनी चिंपांझींवर बरेच प्रयोग केले. जर्नल ऑफ लीडरशिप अँड ऑर्गनायझेशनल स्टडीजमध्ये १७ वेगवेगळ्या स्केलवर हे निरीक्षण करण्यात आले. यात स्वत:चे मूल्य, आयक्यू, ईक्यू, नेतृत्व आणि लैंगिक इच्छा याचे निरीक्षण करण्यात आले. या काळात काही गोष्टी स्पष्ट झाल्या. अल्फा प्रकारात मोडणाऱ्या मादी चिंपांझी इतरांपेक्षा वेगळ्या असल्याचे निदर्शनास आले. त्या बहुतेक बाबतीत पुढे राहतात. पण दयाळूपणा आणि प्रेमाच्या बाबतीतही त्या मागे नाहीत.

खूप संवेदनशील असतात

दुसर्‍या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, अल्फा पुरुषांप्रमाणेच, अल्फा महिला मनापासून प्रेम करतात आणि तितक्याच संवेदनशील असतात. डच प्राइमेटोलॉजिस्ट फ्रान्स डी वॉल यांनी अनेक अभ्यासांत हे सिद्ध केले. ते त्यांच्या गटाबद्दल किंवा त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीबद्दल सर्वात संवेदनशील असतात. कोणत्याही सदस्याला थोडीशीही समस्या आली, तर त्याची जबाबदारी अल्फा महिला लगेच उचलतात. या कारणामुळे त्यांची स्ट्रेस लेवल देखील इतरांपेक्षा जास्त असते. तज्ज्ञ त्याला ‘कॉस्ट ऑफ पॉवर’ म्हणतात. हे देखील दिसून आले की, सरासरी प्रतिभा असलेले लोक सर्वात आरामशीर आणि कमी तणावपूर्ण जीवन जगतात.

कोणते हार्मोन अल्फा किंवा नॉन-अल्फा बनवतात?

यावर उत्तर अमेरिकेत एक अभ्यास झाला, जो पहिल्यांदाच महिलांवर होता. ‘हार्मोन्स एंड द ह्युमन अल्फा फिमेल’ नावाच्या अभ्यासाचा सॅम्पल साईज लहान होता. पण त्याचे परिणाम आश्चर्यकारक होते. पुरुषांमध्ये असलेले हार्मोन्सच अल्फा महिलांमध्ये जास्त आढळतात, असे आढळून आले.

कोणत्या हार्मोनचा काय परिणाम होतो?

यासाठी टेस्टोस्टेरॉन, कोर्टिसोल, ऑक्सीटोसिन, प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रॅडिओल या पाच हार्मोन्सची तपासणी करण्यात आली. एस्ट्रॅडिओल हार्मोनचे कार्य प्रजनन प्रणाली मजबूत करणे असते. मासिक पाळीत त्याची वाढलेली पातळी अंडी परिपक्व करते. हा हार्मोन अल्फामध्ये नॉन-अल्फा पेक्षा कमी असतो. ऑक्सिटोसिनला प्रेम आणि भावनांचे रसायन देखील म्हणतात. हे देखील एक स्त्री संप्रेरक आहे, जे प्रसूतीनंतर पुनरुत्पादन आणि स्तनपानामध्ये महत्वाची भूमिका बजावते. अल्फा श्रेणीतही त्याचा अभाव असल्याचे अभ्यासात आढळून आले आहे.

प्रोजेस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉन यांना सेक्स हार्मोन्स म्हणतात, जे अनुक्रमे महिला आणि पुरुष दोघांमध्ये असतात. टेस्टोस्टेरॉन देखील काही प्रमाणात स्त्रियांमध्ये असते. ज्या महिलांमध्ये याचे प्रमाण जास्त असते त्या अल्फा महिला वर्गात येऊ शकतात. परंतु हे नेहमीच आवश्यक नसते. रासायनिक असंतुलनामुळे हे घडण्याचीही शक्यता आहे. कोर्टिसोल हार्मोनला ‘स्ट्रेस’ हार्मोन देखील म्हणतात. ताणतणावाच्या काळात ते अनेकदा जास्त तयार होते. अल्फा महिलांमध्ये त्याची पातळी कमी असते कारण त्या बहुतेक गोष्टींवर नियंत्रण ठेऊ शकतात.

महिला स्पर्धा का टाळतात?

पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया स्पर्धेपासून दूर राहतात, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. पण नवीन संशोधनाने हेही चुकीचे सिद्ध केले आहे. अॅरिझोना विद्यापीठाने नोव्हेंबर २०२१ मध्ये एक अभ्यास केला, ज्यामध्ये असे दिसून आले की, जर महिला स्पर्धेत उतरल्या तर त्या पुरुषांपेक्षा अधिक आक्रमक असतात आणि कोणत्याही परिस्थीतीत जिंकण्याचा प्रयत्न करतात. त्याचे संशोधन प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रकाशित झाले आहे.

पुरुष आणि स्त्रियांसाठी वापरल्या जाणार्‍या आणखी काही श्रेणी…

  • बीटा श्रेणीतील लोक वाद टाळण्यासाठी अनेकदा मौन बाळगतात. ते मैत्रीपूर्ण असतात.
  • गामा श्रेणीतील लोकांचे जीवन आपल्या सभोवतीच फिरत असते. परंतु ते स्वतंत्र आणि संघटित मानले जातात.
  • ओमेगा लोक कमी बोलतात परंतु अत्यंत प्रतिभावान आणि संवेदनशील असतात. ते अनेक प्रकारे अल्फासारखेच आहेत.
  • डेल्टा श्रेणीतील लोक ते असतात जे पूर्वी अल्फा होते. त्यांना लोकांमध्ये मिसळायला आवडत नाही. पण जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळते
  • तेव्हा ते इतरांपेक्षा वेगळे असल्याचे सिद्ध करतात.
  • सिग्मा अंतर्गत येणारे लोक खूप भावनिक असतात आणि कोणाशीही पटकन जोडले जातात. वैज्ञानिकांनी या सर्व श्रेणींमध्ये मानवावर कोणतेही संशोधन केले नाही. त्यामुळे व्यक्तिमत्त्वाच्या प्रकारावर निश्चितपणे काहीही सांगता येत नाही.

हेही वाचा : 

Back to top button