Tripti Dimri : इंटिमेट सीन करताना सेट बंद झाला अन्…तृप्ती डिमरीने सांगितला बोल्ड सीनचा ‘तो’ किस्सा

Tripti Dimri : इंटिमेट सीन करताना सेट बंद झाला अन्…तृप्ती डिमरीने सांगितला बोल्ड सीनचा ‘तो’ किस्सा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ॲनिमल चित्रपटातील रणबीर कपूरसोबतचा इंटिमेट सीन कसा शूट करण्यात आला, याबाबत अभिनेत्री तृप्ती डिमरीने खुलासा केला आहे. (Tripti Dimri ) तृप्ती डिमरीने ॲनिमलमध्ये रणबीरसोबत इंटिमेट सीन दिल्यानंतर सोशल मीडियावर धुमाकूळ पाहायला मिळाला. एका मुलाखतीत तृप्तीने सांगितले की, इंटिमेट सीन करताना सेटवर काय काय घडलं? (Tripti Dimri )

संबंधित बातम्या –

अॅनिमल चित्रपटाच्या आधी तृप्तीने बुलबुलमध्ये रेप सीन केली होता. तिचे म्हणणे आहे की, रणबीरसोबत दिलेले इंटिमेट सीन हे बुलबुलमधील रेप सीनसमोर काहीच नव्हते. बुलबुलमधील सीन सर्वात आव्हानात्मक होता.

ॲनिमलच्या शूटिंगबद्दल ती म्हणाली की, दिग्दर्शक संदीप वांगा यांनी इंटिमेट सीनच्यावेळी सेट बंद केला होता. सेटवर फक्त रणबीर, दिग्दर्शक संदीप आणि सिनेमॅटोग्राफर होते. संदीप वांगा प्रत्येक पाच मिनिटाला मला विचारत होते की, तू ठिक आहेस ना? तुला काही हवंय का? ती म्हणाली की, सेटवर माझी काळजी घेतली गेली. त्यामुळे मला कोणतीही अस्वस्थता वाटली नाही.

एका सीनमध्ये तृप्ती (जोया) आणि रणबीर (विजय) च्या समोर सर्व सत्य गोष्टी सांगते. हा सीन करताना ती खूप निरास होती.

तिने म्हणाली की, सेटवर ती पूर्ण तयारीने जाते. पण, रणबीरच्या समोर ती आपले डायलॉग्ज बोलू शकत नव्हती. पण रणबीरने तिला मदत केली.

आपले डायलॉग्ज व्यवस्थित बोलता येत नव्हते तरीदेखील तिला सर्वांनी समजून घेतलं. रणबीरबद्दल ती म्हणाली की, माझ्या लाईन्समध्ये त्याने संपूर्णपणे माझी मदत केली.

रणबीर-तृप्ती शिवाय ॲनिमलमध्ये रश्मिका मंदाना, अनिल कपूर आणि बॉबी देओल याच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाने वर्ल्डवाईट बॉक्स ऑफिसवर ५६३ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Triptii Dimri (@tripti_dimri)

 

View this post on Instagram

 

A post shared by Triptii Dimri (@tripti_dimri)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news