Article370 : जम्मू – काश्मीरमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था

File Photo
File Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी श्रीनगरमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधी पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांना नजर कैदेत ठेवण्यात आले आहे.

जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे राज्‍यघटनेतील कलम 370 रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज (दि.११) सर्वोच्‍च न्‍यायालय आपला निर्णय देणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्‍या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती संजीव खन्ना, बीआर गवई आणि सूर्यकांत यांचे खंडपीठ हा निकाल देणार आहे. या प्रकरणी सलग १६ दिवस सुनावणी झाली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ५ सप्टेंबर २०२३ रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news