Vision India@2047 : पंतप्रधान मोदी आज सादर करणार भारताच्या भविष्याचा रोडमॅप | पुढारी

Vision India@2047 : पंतप्रधान मोदी आज सादर करणार भारताच्या भविष्याचा रोडमॅप

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : विकसित देश बनण्यासाठी अग्रेसर असलेल्या भारतासाठी महत्त्वाचे असलेले विकसित भारत 2047 हे व्हिजन डॉक्युमेंट सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी जारी करणार आहेत. भारताची अर्थव्यवस्था लवकरच पाच ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठून तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार असून देशाला विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी हे व्हिजन डॉक्युमेंट असणार आहे.

सोमवारी एका व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी विकसित भारत 2047 हे डॉक्युमेंट जारी करतील. त्यात स्वातंत्र्याचा शतकपूर्तीवेळी भारताला विकसित देश म्हणून उभे करण्याचा उद्देश असणार आहे.

पंतप्रधान मोदी यावेळी देशातील विद्यापीठांच्या कुलपती व कुलगुरुंशी संवाद साधणरा आहेत. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी हे युवकांना देशाच्या राष्ट्रीय योजना, प्राधान्यक्रम आणि लक्ष्यपूर्तीसाठी सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन करणार आहेत.

विकसित भारत 2047 चे एक लक्ष्य युवकांना विकासाची वाट दाखवणे हा आहे. याच मार्गावर वाटचाल करीत देशातील तरुणांची शक्ती विकसित भारत निर्मितीत योगदान देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी युवकांसमोर आपली योजना सादर करणार असून त्यांना सहभागाचे आवाहन करणार आहेत.

हेही वाचा : 

Back to top button