देशातील पहिली ‘बुलेट ट्रेन’ लवकरच | पुढारी

देशातील पहिली ‘बुलेट ट्रेन’ लवकरच

नवी दिल्ली : मुंबई-अहमदाबाद मार्गावर देशातील पहिली बुलेट ट्रेन लवकरच धावणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी साबरमती मल्टिमीडिया ट्रान्स्पोर्ट टर्मिनल्सची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

अंतर 508 कि.मी.

508 कि.मी. अंतरावर बुलेट ट्रेन धावणार आहे. या मार्गावर 26 कि.मी.चा बोगदा असणार आहे. 10 किलोमीटरचा पूल आणि नदीवर 7 कि.मी.चा बांध असणार आहे. 4.8 हेक्टरवर प्लॅटफॉर्मचे काम करण्यात येणार असून जमिनीपासून 24 मीटरपर्यंत प्लॅटफॉर्मचे काम करण्यात येईल.

खर्च 1.08 लाख कोटी

बुलेट ट्रेनसाठी एवढा खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकार 10 हजार कोटींची तरतूद करणार असून महाराष्ट्र आणि गुजरात सरकार प्रत्येकी 5 हजार कोटींची मदत करणार आहे. उर्वरित निधी जपानकडून कर्ज स्वरूपात घेण्यात येणार आहे.

एक लाख 33 हजार चौरस मीटर क्षेत्रावर साबरमती या ठिकाणी भव्य संकुल उभा करण्यात येणार आहे. बांद्रा-कुर्ला येथेही महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने संकुलाचे काम सुरू असून आतापर्यंत 15 टक्के काम पूर्ण झाले आहे. 2027 पर्यंत स्टेशनचे काम पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. सप्टेंबर 2017 मध्ये अहमदाबाद या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आले.

Back to top button